पूरग्रस्त गावातील पाणीपुरवठा, शेती वीजबिल माफ करा, सांगलीकरांचं उर्जामंत्री नितीन राऊत यांना साकडं

पूरग्रस्त गावातील पाणी पुरवठा, शेतीवीज बिल माफ करा, असं सांगली जिल्ह्यातील आमणापूरच्या ग्रामस्थांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना साकडं घातलं.

पूरग्रस्त गावातील पाणीपुरवठा, शेती वीजबिल माफ करा, सांगलीकरांचं उर्जामंत्री नितीन राऊत यांना साकडं
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 1:30 PM

सांगली : पूरग्रस्त गावातील पाणी पुरवठा, शेतीवीज बिल माफ करा, असं सांगली जिल्ह्यातील आमणापूरच्या ग्रामस्थांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना साकडं घातलं. उर्जामंत्री नितीन राऊत आज सांगली जिलह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी स्थानिक नागरिकांनी पूरग्रस्त भागातील उर्जामंत्र्यांकडे वीज बिल माफ करा, अशी मागणी केली.

उर्जामंत्री नितीन राऊत सांगली जिलह्याच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आलेले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी आज राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आलेले आहेत. महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन उर्जामंत्री राऊत यांनी पलूस तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना दिले. यावेळी त्यांच्या समवेत राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.

पूरग्रस्त भागातील वीज बिल माफ करा, स्थानिकांची उर्जामंत्र्यांकडे मागणी

यावेळी आमणापूर ग्रामस्थांनी शेतकऱ्यांचे शेती विजबील माफ करण्यात यावे, पुरग्रस्त गावातील नळपाणी पुरवठा योजनांचे वीजबिल माफ करावी, विठ्ठलवाडी येथे विज वितरण सबस्टेशन करावे, महापूराने उध्वस्त झालेले गावातील वीजेचे ट्रान्सपोर्ट, मीटर, पोल तत्काळ दुरुस्ती करण्यात यावे अशा मागण्यांचे गाराने उर्जामंत्री राऊत यांच्या समोर मांडून निवेदन दिले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची शाहुपुरीत समोरासमोर भेट

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापूरच्या पूरग्रस्त अशा शाहूपुरीची पाहणी करत असताना एकमेकांसमोर आले, दोघेही भेटले, आणि बोललेही. राज्यातले दोन टॉपचे नेते असे अचानक भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पण ह्या भेटीची इनसाईड स्टोरी वेगळीच आहे.

मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कळालं की, फडणवीसही त्याच भागात पाहणी करतायत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहूपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा, एकत्र पाहणी करु असा आग्रह देखील ठाकरेंनी धरला. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत, ते शाहूपुरीतच थांबले आणि दोघांची भेट अशा पद्धतीनं झाल्याचं कळतंय.

(Waived the electricity bill in the flooded area demand Sangalikar To Energy Minister nitin Raut)

हे ही वाचा :

पाचच मिनिटं एकत्र भेटले; देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?

रिमझिम पाऊस, मोराचा पिसारा फुलवून सुंदर नाच, नागपुरातल्या राजभवनाचं सौंदर्य खुललं!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.