1 हजार मीटरचं अंतर सहा मिनिटात कापलं, अवघ्या तीन वर्षाच्या मुलीची वेगवान दौड, एकाच दिवशी दोन विक्रमांची नोंद

आर्याने वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट अ‍ॅन्थोनी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत एक हजार मीटरचं अंतर अवघ्या सहा मिनिटं एक सेकंदात पार केले आहे.(Wardha Arya Takone girls sets new record)

1 हजार मीटरचं अंतर सहा मिनिटात कापलं, अवघ्या तीन वर्षाच्या मुलीची वेगवान दौड, एकाच दिवशी दोन विक्रमांची नोंद
Wardha Arya Takone
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 3:25 PM

वर्धा : अवघ्या तीन वर्षे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या पावलांनी वेगवान धावत रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. आर्या टाकोने असे या चिमुकलीचे नाव आहे. आर्याने एक हजार मीटरचं अंतर अवघ्या सहा मिनिट एका सेकंदात पूर्ण केले आहे. त्यामुळे तिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.  (Wardha Arya Takone girls sets new record 1 km run distance cover in 6.1 minutes)

वर्ध्याच्या पुलगाव येथे राहणारी आर्या पंकज टाकोने. आर्याने वर्ध्यातील गांधीजींच्या पुतळ्यापासून सेंट अ‍ॅन्थोनी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत एक हजार मीटरचं अंतर अवघ्या सहा मिनिटं एक सेकंदात पार केले आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.

ठरलेल्या वेळापेक्षा कमी वेळात अंतर पूर्ण

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी एक हजार मीटर अंतर धावण्यास आठ मिनिटं तर एशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी सात मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र आर्यानं हे अंतर त्यापेक्षाही कमी वेळात पूर्ण करून रेकार्डवर नाव नोंदवलं आहे. या रेकॉर्डची घोषणा डॉ. मनोज तत्ववादी यांनी केली आहे.

आर्याची ऑलिम्पिकसाठीची तयारी करणार

आर्याचे वडील हे पोलिस कर्मचारी असून ते स्वत: खेळाडू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आर्याची यासाठी तयारी सुरू आहे. तसेच पुढे भविष्यात तिची ऑलिम्पिकसाठीची तयारी करणार आहे. तसेच ती भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी खेळाडू व्हावी, अशी इच्छा आर्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

आर्याच्या वेगानं पडलेल्या पावलांनी दोन रेकॉर्डवर नाव कोरलं आहे. त्यामुळे पुढे भविष्यात आणखी वेगानं पावलं पडत ती नवीन रेकॉर्ड स्थापित करेल, असा विश्वास अनेकांना आहे. (Wardha Arya Takone girls sets new record 1 km run distance cover in 6.1 minutes)

संबंधित बातम्या : 

सिंहगड, खडकवासला धरणावर जाताय? गर्दी करणाऱ्या पर्यटकांवर दंडासह गुन्हाही दाखल

तब्बल 10 वर्षांपासून वीज जोडणी नाही, शेवटी विहिरीत उतरून आत्महत्येचा प्रयत्न, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

नागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.