हृदयद्रावक ! पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न, बैलाचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता, पाहा व्हिडीओ
नाल्यातील पुरातून बैलगाडी घेऊन जाण्याच्या प्रयत्न एका शेतकऱ्याच्या अंगलट आला आहे. नाला पार करण्याच्या प्रयत्नात बैलगाडीसह हा शेतकरी वाहून गेला.
वर्धा : जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात जोरदार पावसामुळं नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे तास या गावात एक घटना घडली आहे. या गावाजवळ असलेल्या नाल्यातील पुरातून बैलगाडी घेऊन जाण्याच्या प्रयत्न एका शेतकऱ्याच्या अंगलट आला आहे. नाला पार करण्याच्या प्रयत्नात बैलगाडीसह हा शेतकरी वाहून गेला. या घटनेचा व्हिडीओदेखील पुढं आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. (wardha farmer swept away in flood due to heavy rain)
बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून
मिळालेल्या माहितीनुसार सध्या वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. यावेळी समुद्रपूर तालुक्यातील तास या गावात एक विदारक घटना घडली. येथे पुराच्या पाण्यातून बैलगाडी काढण्याचा प्रयत्न करताना एक शेतकरी तसेच बैलगडी वाहून गेली आहे. वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव संतोष शंभरकर आहे. बैलगाडीला जुंपलेला एक बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळला आहे. तर दुसरा एक बैल आणि संतोष शंभरकर यांचा शोध सुरु आहे.
पाहा व्हिडीओ :
खुरपणी करण्यासाठी गेलेली महिला गेली वाहून
नदी, नाल्यांना पूर आलेला असताना जीव धोक्यात घालणे चुकीचे आहे. कोठेही जायचे असेल तर पाणी ओसरण्याची वाट पाहणेच हिताचे आहे. दरम्यान अशीच एक घटना याच तालुक्यातील लाहोरी रोडवरील वाघाडी नाल्याच्या पुलावर घडली. या घटनेत शेतात खुरपणी करण्याकरिता गेलेली महिला वाहून गेलीय. रंभाबाई मेश्राम अस महिलेचं नाव आहे. ही महिला शेतात खुरपणी करून परत येत होती. या दोन्ही घटनांमध्ये वाहून गेलेला शेतकरी आणि महिला अद्याप सापडलेले नाहीत.
इतर बातम्या :
Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता
Maharashtra Rain Live | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
VIDEO | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, रात्री पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा
(wardha farmer swept away in flood due to heavy rain)