Video | मद्यपी एपीआयचा भर चौकात धिंगाणा, भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी दारुच्या नशेत भर चौकात धिंगाणा घातला आहे.

Video | मद्यपी एपीआयचा भर चौकात धिंगाणा, भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल
WASHIM API
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 6:29 PM

वाशिम : पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यावर असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी दारुच्या नशेत भर चौकात धिंगाणा घातला आहे. त्यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा करत भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. एपीआय भारसाकळे यांनी केलेले हा गोंधळ पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. (Washim API Mahadev Bharasakle got drunk and used abusive word against women)

वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरात धिंगाणा

मिळालेल्या माहितीनुसार वाशिम पोलीस अधिक्षक कार्यालयात महादेव भारसाकळे हे एपीआय म्हणून रुजू झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त दारुचे सेवन करत वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरात धिंगाणा घातला. तसेच यावेळी या परिसरात भाजीविक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ केली. दारुच्या नशेत राडा घालणाऱ्या एपीआय महादेव भारसाकळे यांना पाहण्यासाठी यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

वाशिम पोलिसांकडून भारसाखळे यांना समज देण्याचा प्रयत्न

दरम्यान, हा प्रकार समजताच वाशिम शहर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी गुरूवार बाजार परिसरात दाखल होत एपीआय महादेव भारसाकळे यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारसाकळे ऐकत नसल्यामुळे पोलिसांना चांगलेच परिश्रम घ्यावे लागले. हा प्रकार समोर आल्यानंतर वाशिम पोलीस दलावर सर्व स्तरातून टीका होत आहे. तसेच दारुच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या एपीआय महादेव भारसाकळे यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

Video | माणसाने जिंवत साप पकडला अन् नाकात टाकला, पुढे काय झालं ? एकदा पाहाच

Viral Video | अमेरिकन रॅपरने समुद्र आणि टॉयलेटमध्ये कोट्यवधी रुपयांची केली उधळण, व्हिडिओ पाहून लोकांनी बनवले मजेदार

Photo : पाहावं ते नवलंच.., पाहा झोम्बीच्या हातासारख्या फंगसची दुर्मिळ प्रजाती

(Washim API Mahadev Bharasakle got drunk and used abusive word against women)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.