Washim : लस न घेणाऱ्यांना प्रशासनाचा दुसऱ्या दिवशीही दणका, 53 जणांकडून दंड वसूल
वाशिम (Washim) जिल्ह्यात काल 4 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून 23 हजार 800 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
वाशिम : कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम (Corona Vaccination) वेगाने राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने 27 नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाने सर्व पात्र व्यक्तींना लस (Corona Vaccination ) घेणे बंधनकारक केले असताना जिल्ह्यात काही व्यक्ती लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे.राज्य शासनाच्या (Maharashtra Government ) या आदेशाची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांच्या मार्गदर्शनात कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. वाशिम (Washim) जिल्ह्यात काल 4 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत लस न घेतलेल्या 53 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून 23 हजार 800 रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई महसूल विभागाच्या वतीने करण्यात आली. लस घेण्यास टाळाटाळ करून ज्यांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही, त्यांचा शोध घेऊन जिल्ह्यात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लस न घेता बिनधास्त फिरणाऱ्या व्यक्तींना लगाम बसणार आहे.
नेमका किती दंड वसूल झाला?
काल कारंजा उपविभागीय अधिकारी यांनी कारंजा शहरात लसीकरण न करता खासगी आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या तीन व्यक्तींना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आणि लस न घेता प्रवाशी वाहतूक करणाऱ्या 7 चालकांना 800 रुपये दंड ठोठावला. तहसीलदार मालेगाव यांनी शहरातील दहा आणि ग्रामीण भागातील तीन अशा एकूण 13 खासगी आस्थापनांना 6 हजार 500 रुपये, मंगरूळपीर तहसीलदार यांनी शहरातील 9 खासगी आस्थापनांना 4500 रुपये आणि तहसीलदार कारंजा यांनी शहरी भागातील 18 आणि ग्रामीण भागातील 3 अशा एकूण 21 खाजगी आस्थापनांच्या व्यक्तींवर 10 हजार 500 रुपये दंड आकारला.यापुढेही जिल्ह्यात लस न घेतलेल्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
मास्कचा वापर करण्याचे आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक पात्र नागरीकांनी कोविड लस घेवून आपले आरोग्य सुरक्षित राखावे. तसेच नियमित मास्कचा वापर करणे, सुरक्षित सामाजिक अंतर राखणे आणि हात साबणाने वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसुत्रीचा वापर नागरीकांनी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या:
Video| बीडमध्ये आगार प्रशासनाकडून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न; महिला कर्मचाऱ्यांना आश्रू अनावर
Washim District Administration charge fine those who not take corona preventive vaccine on second day