वाशिममध्ये सुस्साट लसीकरण, ‘या’ तालुक्यात 18 वर्षांवरील 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वाशिम : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरकारकडून महाराष्ट्रात कोरोना लसीकरण मोहिमेवरही भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना लसीकरणात वाशिममधील रिसोड नगरपालिकेने 18 वर्षांवरील तब्बल 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करत नवा उच्चांक केला आहे. (Washim Risod municipality vaccinated 90 percent of people over the 18 age)
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेला सर्व ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात 18 वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या ही 28 हजार आहे. यातील तब्बल 24 हजार व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे रिसोडमधील लसीकरणाचे प्रमाण हे 90 टक्क्यांपर्यंत गेले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यात आरोग्य विभागासह स्थानिक नगरपालिका तसेच समता फाऊंडेशनने मोलाचे योगदान दिले आहे.
तब्बल 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण
कोरोना लसीकरणाबाबत वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिकेने उच्चांक गाठला आहे. शहरातील 18 वर्षांवरील तब्बल 90 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याची उल्लेखनीय कामगिरी आरोग्य विभागासह स्थानिक नगरपालिकेने केली आहे. या मोहिमेत रिसोड शहरातील समता फाऊंडेशनचे महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देणे, लसीकरणाची भीती लोकांच्या मनातून काढण्याचे कार्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
पाच ठिकाणी लसीकरण शिबिर
रिसोड शहरातील पाच ठिकाणी लसीकरण शिबिर घेण्यात आली होती. त्यात तब्बल 17000 व्यक्तींचे लसीकरणाचे पूर्ण करण्यात आले. समता फाउंडेशनकडून जवळच असलेल्या गोवर्धन येथे ही 100 टक्के लसीकरण करण्यात आले.
नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपासhttps://t.co/OZcb8ovcjV#NagpurCrime #Robbery #Nagpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 6, 2021
(Washim Risod municipality vaccinated 90 percent of people over the 18 age)
संबंधित बातम्या :
पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी
कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण, डॉ. मनीष त्रिपाठीसह 2 जणांवर गुन्हा दाखल
रायगडमधील JNPT बंदरात DRI ची मोठी कारवाई, 879 कोटी रुपयांचं 293 किलो हेरॉईन जप्त