सिंधुदुर्ग : कोकणात टॅलेंटची (Talent in Konkan) कमी नाही. कोकणातला माणूस कधी, कुठे, काय करेल, याचाही काही नेम नाही. ट्रॅफिकमध्ये गणपतीला जाताना अडकले म्हणून भर रस्त्यात गाडी लावून ‘गण्या धाव रे’वर नाचणाऱ्यांनीही कम्माल केलेली होतीच. त्यानंतर श्रीवल्ली (Srivalli Song in Double bari) गाणं थेट डबलबारीत वाजवूनही धम्माल उडवून दिलेले आहेत. आणि आता तर चक्क कोकणात होळीला संकासूर थेट क्रिकेटच्या मैदानावरच उतरला. संकासुराची बॅटिंग सध्या व्हायरल (viral video) झाली आहे. कोकणात होळीच्या निमित्त संकासूर इलो रे, पळा पळा, अशी ओरड ऐकायला मिळतेय. आता आयपीएलही जवळ आलंय. क्रिकेटची चर्चा रंगणार आहेच. अशावेळी चक्क संकासूर थेट मैदानात क्रिकेट खेळताना दिसल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसलाय.
कोकणातल्या होळी उत्सवाची एक वेगळीच धूम असते. होळी उत्सवाच्या या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त निव्वळ धम्माल असेत. यासाठी दारोदारी गोमूचे नाच, खेळे येत असतात. यात सर्वांना आकर्षित करतो तो गोमू आणि संकासुर. संकासुराच्या नाना करामती सर्वांनी पाहत राहाव्या अशाच असतात. दारात येऊन नाचणारा, खेळ करणारा संकासुर क्रिकेटच्या मैदानात दिसला तर?
आता संकासुराच्या वेशात नुसता खेळाडू दिसला, तरी आश्चर्य वाटेल. पण संकासुराच्या वेशातील एकाला तर बॅटिंग करण्याचा मोह जराही आवरला नाहीये. या पठ्ठ्यानं संकासुराच्या वेशातच बॅटिंग करायला सुरुवात केली. या व्हिडीओची चर्चा झाली नसती, तरच नवल!
सध्या हा एक व्हिडीओ वायरल झाला असून नेमका तो कुठल्या गावातला आहे, हे मात्र कळू शकलेले नाही. सध्या कोकणातही वेगवेगळ्या क्रिकेट टुर्नामेन्टचा माहोल आहेत. अशावेळी गावागावत मुलांच्या प्रॅक्टिसही सुरु आहेत. मात्र अशा सगळ्यात संकासुरानं चक्क बॅटिंग करताना व्हिडीओ पाहून अनेकांना तो व्हिडीओ शेअर करण्याचा मोहही आवरला नाहीये. संकासुराचं सोंग फक्त कोकणातच काढले जाते. त्यामुळे हा व्हिडीओ कोकणातलाच असावा, असाही तर्क लावला जातोय. कोकणताली अनेकांचे व्हॉट्सअप स्टेटस सध्या या संकासुराच्या व्हिडीओनं व्यापून गेलेत. आता या बॅट्समन संकासूर नेमका आहे कोणत्या गावातला, यावरुन तुफान चर्चा रंगली आहे.
…आणि अशाप्रकारे कावळ्यानं वाचवला उंदराचा जीव! लोक म्हणतायत, मैत्री असावी तर अशी…
‘शांतपणे उभा होता ना बैल, काठीनं मारण्याची काय गरज होती?’ कसा शिकवला आजोबांना धडा? पाहा Viral video
मगरीला मिठी मारल्यानंतर लोक म्हणतायत, माणसाने अशा क्रूर प्राण्यांपासून दूर राहायला हवे! Video viral