3 पक्षांचं सरकार असताना ठाकरे काँग्रेसपुढं माथा टेकवत होते, जे. पी. नड्डा यांची जोरदार टीका

आताच्या शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिंदे-फडणवीस सरकारनं तीन लाख ७५ हजार कोटी रुपयांचे फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणलंय, असंही जे. पी. नड्डा यांनी सांगितलं.

3 पक्षांचं सरकार असताना ठाकरे काँग्रेसपुढं माथा टेकवत होते, जे. पी. नड्डा यांची जोरदार टीका
जे. पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 5:06 PM

चंद्रपूर : तीन पक्षांचं सरकार असताना उद्धव ठाकरे काँग्रेसपुढं माथा टेकवत होते, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. चंद्रपूर येथील भाजपच्या सभेत ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने दलाल आणि कमिशनखोरी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जे. पी. नड्डा म्हणाले, हिंदू सम्राटांचा मुलगा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावात आले होते. काय झालं होतं. भ्रष्टाचार केला. तीन दुकानं सुरू केली होती. पहिल्यांदा शिवसेनेला द्या म्हणजे उद्धव ठाकरे यांना. तीथं माथा टेका. मग, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर माथा टेका. माथा टेकता टेकता माथाही झुकला.

आमचा उद्देश हा डीबीटी डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफ्रर असा आहे. तर महाविकास आघाडीत डीलरशीप ब्रोकेज आणि ट्रान्सफर, अशी पद्धत होती. डीलरशीप करा, दलाली करा नि ट्रान्सफर करून पैसा कमवा, अशी टीका जे. पी. नड्डा यांनी केली.

मला दुःख होतं. महाराष्ट्र हा आपल्या शौर्यासाठी ओळखला जात होता. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला साथ दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा विरोध केला होता. त्यांच्यासोबत फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन केलं होतं, असंही जे. पी. नड्डा म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं डबल इंजन आहे. त्यांच्या माध्यमातून बरेच कार्यक्रम झाले. गुजरात व्हायब्रेट असेल तर महाराष्ट्र मॅग्नेटिक आहे. आधी महाविकास आघाडीचे पिछाडी सरकार होते. आताच्या शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिंदे-फडणवीस सरकारनं तीन लाख ७५ हजार कोटी रुपयांचे फॉरेन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणलंय, असंही जे. पी. नड्डा यांनी सांगितलं.

'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.