खोल दरीत फेकलेला तो औषधांचा साठा कुठला? हे पाप कुणाचं?

या औषधांचा योग्य प्रमाणात वापर केला जात नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे औषधांवर नियंत्रण ठेवण्याऱ्या यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

खोल दरीत फेकलेला तो औषधांचा साठा कुठला? हे पाप कुणाचं?
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 9:53 AM

नंदुरबार : राज्यातील काही लोकं अतिशय गरीब आहेत. त्यांना वेळेवर औषध ( drugs) मिळत नाही. त्यामुळे ते दगावतात. त्यांचे आयुष्यमान कमी होते. उलट जे वेळेवर औषधोपचार करू शकतात. त्यांचे आयुष्यमान वाढते. औषध रुग्णाला बरे करते. पण, या औषधाचा योग्य वापर केला गेला पाहिजे. नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक बाब पुढं आली. या औषधांचा योग्य प्रमाणात वापर केला जात नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे औषधांवर नियंत्रण ठेवण्याऱ्या यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

रस्त्याच्या बाजूला फेकला औषधाचा साठा

आरोग्याचा अनेक समस्या असलेल्या नंदुरबारच्या दुर्गम भागात औषध साठा फेकल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. यातून आरोग्य विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचाही पंचनामा होत आहे. धडगाव तालुक्यातील धावलघाटमधील चिंचालाबारी या शिवारात रस्त्याच्या बाजूला खोलदरीत खोक्यांमध्ये भरून औषध साठा फेकल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

घाटात दोन ठिकाणी सापडला औषधसाठा

यातील काही औषधसाठा मुदत बाह्य आहे का? किंवा वापराचा आहे, हाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घाटात दोन ठिकाणी औषध साठा फेकल्याचे समोर आले आहे. यात काही वापरलेला औषध साठा असून तो का फेकला गेला हा एक प्रश्न आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार

तसेच औषध साठा उघड्यावर आणून कोणी फेकला ही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. हा औषध साठा सरकारी की खाजगी याची चौकशी होण्याची मागणी केली जाते. यासंदर्भात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. चौकशी करून पूर्ण माहिती दिली जाईल, असं सांगितलं.

चौकशी होणे गरजेचे

औषधसाठी फेकलेल्या अवस्थेत सापडला. याची चौकशी होणे गरजेचे आहे. याशिवाय तो का फेकला. अशाप्रकारे औषधसाठी फेकण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.  एकीकडे गरजूंना औषध मिळत नाही. दुसरीकडे अशाप्रकारे औषधी फेकल्या जातात. त्यामुळे योग्य प्रमाणात वापर करण्याची गरज आहे.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.