आगामी विधानसभा निवडणुकीत मालवणमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी !

मालवण-कुडाळ मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ. खरंतर पूर्वीचा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला. या मतदारसंघावर अगदी 92/95 पासून 2014 पर्यंत राणेंचा कब्जा होता. मात्र गेले दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक आमदार म्हणून निवडून येत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत मालवणमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी !
आगामी विधानसभा निवडणुकीत मालवणमध्ये कोणाची बाजी? वैभव नाईक गड राखणार की राणेंची सरशी !
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 1:11 AM

सिंधुदुर्ग : आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून उतरावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जर तसं घडलं तर आगामी मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. निलेश राणे हे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचं पानीपत करतात की पुन्हा एकदा वैभव नाईक जाइंट किलर ठरतात हे पाहण्यासाठी 2024 ची वाट पाहावी लागणार आहे. (Who will win the upcoming assembly elections in Malvan, Vaibhav Naik or Rane)

मालवण-कुडाळ मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ. खरंतर पूर्वीचा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला. या मतदारसंघावर अगदी 92/95 पासून 2014 पर्यंत राणेंचा कब्जा होता. मात्र गेले दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक आमदार म्हणून निवडून येत आहेत. आगामी 2024 च्या निवडणुकीत माजी खासदार निलेश राणेंनी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांनी तसं गाऱ्हाणेही घातलं आहे.

वैभव नाईक यांचा या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा

2014 पर्यंत मालवण मतदारसंघात आमदार म्हणून नारायण राणेंचीच वर्णी लागत असे. परंतु 2014 ला नवख्या वैभव नाईक यांनी तगड्या राणेंना चारी मुंडया चित करत विजय मिळवला. खरंतर हा निकाल अनपेक्षित होता मात्र या निकालाने वैभव नाईक यांची राज्य स्तरावर एन्ट्री झाली. त्यांना या विजयानंतर महाराष्ट्रात जाइंट किलर म्हणून संबोधले जाऊ लागले. राणेंचा तो पहिला आणि अनपेक्षित पराभव होता जो संपूर्ण राणे परिवाराच्या जिव्हारी लागला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही राणे समर्थक रणजीत देसाई या उमेदवाराचा पराभव करत आमदार वैभव नाईक यांनी बाजी मारली होती. सलग दोन टर्म आमदार राहिल्यामुळे वैभव नाईक यांचा या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा निर्माण झाला आहे.

काय आहे जाणकारांचं मत

निलेश राणे यांनी पहिलीच खासदारकीची निवडणूक लढवून ते खासदार झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दोनदा पराभव केला. अर्थात त्यावेळी विनायक राऊत यांच्या सोबत असणारी भाजपची मते यावेळी निलेश राणेंच्या सोबत असणार आहेत. त्यामुळे निलेश राणे यांना संधी दिसत असल्यामुळे ते आणखी एकदा लोकसभेची निवडणूक आजमावतील अस जाणकारांना वाटत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मालवण मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विरोधात आयत्यावेळी रणजीत देसाई या राणे समर्थकाला मैदानात उतरवलं होतं. अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर होऊन ही त्यांनी वैभव नाईक यांना कडवी झुंज दिली होती. त्यामुळे वैभव नाईक यांच्यासमोर जर तगडा उमेदवार असेल तर निवडणूक खूपच रंगतदार होईल असं ही जाणकारांना वाटत आहे.

वेट अँड वॉच करणंच सोयीचं

भाजप पक्षाची एक वेगळी पॉलिसी असते. त्यांची उमेदवारी ही वरिष्ठ पातळीवरून ठरवली जाते. हे आज प्रवीण दरेकरांनी ही स्पष्ट केलं आहे. निलेश राणेंचा अति आक्रमक स्वभाव पाहता भाजप त्यांना दिल्लीला पाठवायला तयार होईल का? पाठवलं तर निलेश राणे लोकसभा सोडून विधानसभा लढविण्यास तयार होतील का? अशा अनेक जर तर वर निलेश राणेंची उमेदवारी अवलंबून आहे. त्यामुळे वेट अँड वॉच करणंच सोयीचं ठरेल. (Who will win the upcoming assembly elections in Malvan, Vaibhav Naik or Rane)

इतर बातम्या

VIDEO : उल्हासनगर शहरात गावगुंडांचा हैदोस, 10 हजाराचा हप्ता न दिल्यानं व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला

5 महिन्यांत बुजले 33 हजार खड्डे, आता 24 संयुक्त पथकांची नियुक्ती, रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई पालिकेचा मेगा प्लॅन

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.