ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अशी का झाली?, शंभुराजे देसाईंनी सांगितले कारण

यापूर्वी मंत्रिमंडळाची एक उपसमिती मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली होती. ही समिती मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत होती. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घेतील.

ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था अशी का झाली?, शंभुराजे देसाईंनी सांगितले कारण
संभुराजे देसाईंनी सांगितले कारणImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 9:07 PM

रवी लव्हेकर पंढरपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा ऐकल्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे. त्यांच्याच ऐकण्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची अनैसर्गिक युती उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे दसरा मेळावा किंवा इतर सर्व बाबतीत शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांची अधिक चिंता असल्याचा टोमणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी लगावला.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई हे आज पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी, दसरा मेळाव्याला बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. असे सांगत देसाई यांनी सेनेलाही चिमटा काढला.

ग्रामपंचायतीचे निकाल लागले. ठाकरेंची शिवसेना ही चौथ्या-पाचव्या नंबरवर फेकली गेली. त्यामुळं त्यांना विचार करावा लागेल. कालच्या ग्रामपंचायतीचे निकाल पाहिले, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना ही पहिल्या क्रमांकावर असल्याचंही देसाई म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांच्या सांगण्यावरून अनैसर्गिक युती केली होती. पण, अशा युती फार काळ टिकत नसतात.

यापूर्वी मंत्रिमंडळाची एक उपसमिती मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आली होती. ही समिती मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करत होती. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घेतील.

मराठा आंदोलनात वेगवेगळ्या संघटना सहभा्गी झाल्या होत्या. वेगवेगळे समूह सहभागी झाले होते. त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चार मंत्री सहभागी झाले होते. या चार मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, विखे पाटील, शंभुराजे देसाई आणि दादा भुसे यांचा समावेश होता. दोन तास सर्वांसोबत विस्तृत चर्चा केली.

एमपीएससीमधील नेमणुका रखडल्या होत्या. त्यातील एक हजार 84 विद्यार्थ्यांच्या नेमणुका केल्या. त्याचा कॅबिनेट निर्णय विशेष बाब म्हणून केला, असंही शंभुराजे देसाई यांनी सांगितलं. उर्वरित एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशननंतर नेमणुका देणार असल्याचंही देसाई म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार सकारात्मक आहे. यापूर्वी हा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाताळला आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाचा निर्णय योग्य पद्धतीनं होईल, असंही देसाई यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.