आधी गळा आवळला नंतर पोत्यात भरलं, प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी तिनं पतीला संपवलं, चंद्रपूर हादरलं

पत्नीने प्रियकर आणि आईच्या मदतीने पतीचा गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे ही हादवरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

आधी गळा आवळला नंतर पोत्यात भरलं, प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी तिनं पतीला संपवलं, चंद्रपूर हादरलं
CHANDRAPUR MURDER
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 6:58 PM

चंद्रपूर : पत्नीने प्रियकर आणि आईच्या मदतीने गळा आवळून आपल्याच पतीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे ही हादवरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव मारुती काकडे असे असून ते कोळसा खाणीत कामावर होते. पतीचा गळा खून केल्यानंतर महिलेने मृतदेह पोत्यात भरून बल्लारपूर येथील नदीकिनारी फेकला होता. या हत्या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, पत्नीची आई, पत्नीचा प्रियकर आणि अन्य एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सचा वापर करत अत्यंत क्लिष्ट प्रकरणाचा गुंता सोडवला. मद्यपी पतीला संपवून सरकारी नोकरी मिळवत प्रियकरासोबत विवाह करण्याचा आरोपी पत्नीचा बेत होता. (wife murdered his husband in Chandrapur with help of boyfriend and mother police arrest all accused)

पतीचा खून खरुन प्रियकरासोबत संसार थाटायचा बेत

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ‘पती पत्नी और वो’ चा हिंसक प्रकार पुढे आलाय. जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी काही दिवसांपूर्वी पोत्यात भरून फेकून दिलेला एक मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला होता. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मारूती काकडे हे सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होते. त्यांना दारु पिण्याची सवय असल्याने त्यांचे त्यांच्या पत्नीशी सतत वाद होत असत. मारुती काकडे यांच्या पत्नीचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकले याच्याशी जवळचे संबंध होते. मारूती काकडे यांची पत्नी आणि संजय टिकले या दोघांनी मारूती काकडे यांचा काटा काढण्यासाठी कट रचला. पतीला संपवल्यानंतर त्यांची सरकारी नोकरी आपल्याला मिळेल व प्रियकरासोबत विवाह करून आपले आयुष्य सुखी होईल, असा आरोपी महिलेचा होरा होता.

मृतदेह एका पोत्यात भरून नदी किनारी आणून फेकला

त्यानंतर आरोपी महिला आणि आरोपी संजय टिकले यांनी मारुती काकडे यांना संपवण्याचा बेत आखला. त्यांनी बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे हा कट तडीस नेला. एक साथीदार विकास नागरले याचा वापर यात केला गेला. विकास ठरल्यानुसार मारुती काकडे यांच्या घरी पोहोचला. किरायाचे घर मिळेल का? याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून मारुती यांना दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर घरातून बाहेर पडल्यानंतर नकोडा येथेच मारुती यांचा गळा आवळून खून करण्यात आला. मारुती जिवंत राहू नयेत यासाठी त्यांना नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर मृतदेह एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी मारुती यांचा मृतदेह फेकण्यात आला.

आरोपींना अटक, न्यायालयापुढे हजर केले जाणार

हा प्रकार घडल्यानंतर बल्लारपूर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मयताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केली. तसेच या खुनाचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मारुती यांची पत्नी, पत्नीची आई, पत्नीचा प्रियकर संजय टिकले तसेच साथीदार विकास नागरले या सर्वांचा या खुनामध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. या सर्वांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या प्रियकरासह पत्नीने केलेली पतीची हत्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.

इतर बातम्या :

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

Kamal Sadanah | पत्नी-मुलीची हत्या करुन निर्मात्याने संपवलं होतं कुटुंब, गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो, वाचा रिअल लाईफ ट्रॅजेडी

प्रसिद्ध मॉडेलचं शारीरिक शोषण ते 3 हजार कोटींचा घोटाळा, राम कदम यांचे राज कुंद्रावर गंभीर आरोप

(wife murdered his husband in Chandrapur with help of boyfriend and mother police arrest all accused)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.