गडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी (Wildlife) उच्छाद मांडलाय. चार दिवसांपूर्वी वाघाच्या (tiger attack) हल्ल्यात जंगलात फिरायला गेलेला युवकावर वाघानं हल्ला केला होता. काल पुन्हा वाघाने एका महिलेवर हल्ला केला. ही महिला जंगलात शौचास गेली होती. ही घटना चामोर्शी तालुक्यातील आहे. गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने पळ काढला. अशा नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. तरीही जेरबंद करण्याचे कोणतेही प्रयत्न देखील वनविभाग करीत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडं कुरखेड तालुक्यात अस्वलाच्या कळपाने महिला मजुरांवर हल्ला केला. यात चार महिला (attack on female laborers) गंभीर जखमी झाल्यात त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिला कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील तेंदूपत्ता संकलनाकरिता गेल्या होत्या.
महिला गावाशेजारी जंगलात शौचास गेली होती. अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. वाघाच्या तावडीतून तिने कशीबशी सुटका केली. पण, वाघ तिथून निघायला तयार नव्हता. गावकरी धावून आले. गावकऱ्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर वाघ हळूहळू निघून गेला. त्यामुळं महिलेचा जीव वाचला. या घटनेनं भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोहका राऊंड कक्ष क्रमांक 447 अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जंगलात महिला गेल्या होत्या. या महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात चार महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सकाळी घडली. सीमा रतिराम टेकाम, लता जीवन मडावी, पल्लवी रमेश टेकाम व रमशीला आनंदराव टेकाम या चार जखमी महिलांची नावं आहेत. कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तेंदू संकलन केलं जाते. या तेंदु संकलनासाठी आदिवासी व स्थानिक सकाळी जंगलात जातात. संकलन करून दुपारी आपल्या घरी परततात.