समीर वानखेडे राजकारणात येणार का?; वानखेडे म्हणतात, “मला देशाची…”
सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स काही नेते करायचे. तेव्हा मला लोक म्हणायचे तुला झोप येते का असं विचारायचे? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो. तेव्हा सर्व भीती निघून जायची.
सांगली : राजकारणात येणार का? या प्रश्नावर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले, मला देशाची, भारत मातेची सेवा करायची आहे. मग ते कोणत्याही स्वरूपात असो. मग राजकारण हा देखील देश सेवा करण्यासाठी प्लॅटफॉर्म असू शकतो का? असे म्हणत यावर मात्र समीर वानखेडे यांनी ते काय आता काय सांगता येत नाही. असे म्हणत राजकारणात प्रवेश करण्यावर थेटपणे उत्तर देणे टाळले. मात्र अप्रत्यक्ष राजकारणात (Politics) येण्याचे मूक संकेतही दिले. सांगलीत शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
माझ्यावर आरोप करणारे कुठे आहेत?
समीर वानखेडे म्हणाले, माझ्यावर आरोप करणारे राजकारणी आता कुठे आहेत. ते सर्वांना माहीत आहे, असा चिमटा आयआरएस समीर वानखेडे यांनी राजकारण्यांता काढला आहे. सांगलीत आयोजित श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. माझी जात काढली. मात्र, त्यांना काही सापडले नाही. लोकांना काही काम नसते तेव्हा बाष्कळ चर्चा सुरू होते.
तेव्हा शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो
मीडिया, घाणेरडे राजकारणी, सकाळी दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स काही नेते करायचे. तेव्हा मला लोक म्हणायचे तुला झोप येते का असं विचारायचे? तेव्हा मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचो. तेव्हा सर्व भीती निघून जायची. वाटायचे येऊ देत कितीही मंत्री. हे तर किरकोळ १०० आणि २०० किरकोळ आहेत. त्यामुळं तुमचे आदर्श महापुरुष असले पाहिजेत.
तेव्हा ही संघटना धावून आली
मुंबईतील शिपवर रेड झाल्यानंतर घाणेरडे राजकारणी आपल्यावर टीका करतात. यातून आमचे खच्चीकरण झाले होते. मात्र, शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना धावून आली. तेव्हा आम्हाला वाटले की, आपले मनोधैर्य वाढविणारे कोणीतरी आहे. आशा संघटना पाठीशी उभी राहिल्यानंतर राजकीय लोक जे बोलत होते. त्यावर लोकांचा विश्वास बसला नाही, असंही ते म्हणाले.