Nashik : उन्हाळ्याची चाहूल लागताच चिकन-अंड्याचे दर वधारले, नेमके कारण काय?

एकीकडे राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना दुसरीकडे चिकन आणि अंडी ही महागले आहेत. गतआठवड्याच्या तुलनेत चिकनच्या दरात 40 रुपयांनी वाढ झालेली आहे.उन्हाळ्याला सुरवात होताच असेही चिकनचे दर वाढतात मात्र, यंदा दरवाढीचे प्रमाण हे अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते शिवाय पक्ष्यांचे खाद्याचेही दर वाढलेले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून गतआठवड्यात बॉयलर चिकन हे 220 रुपये किलो होते तर तेच आता 260 रुपयांवर पोहचलेले आहे.

Nashik : उन्हाळ्याची चाहूल लागताच चिकन-अंड्याचे दर वधारले, नेमके कारण काय?
ऐन उन्हाळ्यामध्ये चिकन, अंड्याचे दर वाढलेले आहेत.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 5:36 PM

नाशिक : एकीकडे राज्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत असताना दुसरीकडे (Chicken Rate) चिकन आणि अंडी ही महागले आहेत. गतआठवड्याच्या तुलनेत चिकनच्या दरात 40 रुपयांनी वाढ झालेली आहे.(Summer Season) उन्हाळ्याला सुरवात होताच असेही चिकनचे दर वाढतात मात्र, यंदा दरवाढीचे प्रमाण हे अधिक आहे. उन्हाळ्यामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये (Shortage of water ) पाण्याची टंचाई निर्माण होते शिवाय पक्ष्यांचे खाद्याचेही दर वाढलेले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून गतआठवड्यात बॉयलर चिकन हे 220 रुपये किलो होते तर तेच आता 260 रुपयांवर पोहचलेले आहे. वाढत्या दरामुळे व्यवसायिकांसह ग्राहकही त्रस्त आहेत. मात्र, भविष्यातही दर वाढतीलच असा अंदाज व्यापऱ्यांनी व्यक्त केला आहे. चिकनबरोबरच अंड्याच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र नाशिकच्या बाजारपेठेत पाहवयास मिळत आहे.

पाण्याचा तुटवडा धान्यही महागले

उन्हाळ्यात चिकन, अंड्यासह मटणाचेही दर वाढतात. पण यंदा केवळ चिकन आणि अंड्याच्या दरात वाढ झाली असून मटण हे 660 रुपये किलोवर स्थिर आहे. उन्हाळ्यात पोल्ट्री फार्ममध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. पाणीपुरवठा आणि धान्याचा पुरवठा करताना पोल्ट्रीधारकांचा अधिकचा खर्च होत आहे. त्याचाच परिणाम चिकन आणि अंड्यावर झालेला आहे. मध्यंतरी पोल्ट्रीफार्म धारकांकडून पशूखाद्यासाठी आवश्यक असलेल्या गहू आणि तांदळाच्या दरात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. धान्य महाग होत असतानाच पोल्ट्रीधारकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळेच दरात वाढ झाली आहे.

पुन्हा बर्ड फ्लूचा धोका

राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणामही दरवाढीवर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याच प्रमाणे उन्हाळ्यामध्ये असे देखील वाढणारे चिकनचे दर ,यामुळे आता सर्वसामान्य चिकन व्यवसायिक चांगलेच वैतागले आहेत.. गेल्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक मध्ये चिकन प्रति किलो 40 रुपयांनी महाग झालाय तर अंड्यांचे दर देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत वधारल्याचे चित्र बाजारात बघायला मिळत आहे.

चिकन अंड्याच्या दरात अशी झाली वाढ

गत आठवड्यात बॉयलर चिकन 220 रुपये किलो होते तर मंगळवारी 260 रुपये किलो. गावठी चिकनच्या दरात 30 रुपयांची वाढ झाली आहे. गतआठवड्यात 150 तर या आठवड्यात 180 रुपये दर झाले आहेत. जिवंत कोंबडी गतआठवड्यात 120 तर चालू आठवड्यात 170 रुपायांना मिळत आहे. तर दुसरीकडे 1 डझन अंड्यामागे 5 रुपये दरवाढ झाली आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमधील तांदूळ हडपाहडपीची ‘एसआयटी’ चौकशी करा; आमदार सातपुतेंची विधिमंडळात लक्षवेधी

Nashik | शेतकऱ्याने तब्बल 15 लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान…!

Nashik | राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे तोंडभरून कौतुक; जिल्हाधिकारी गंगाथरन यांचे उत्साहात स्वागत…!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.