राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : धर्माबादजवळ कार उलटून अपघात झाला. या कारमध्ये तीन जण बासरकडे जात होते. परंतु, रस्त्यात अपघात झाल्याने एक ज्येष्ठ महिला जागीच ठार झाली. तर पोलीस कर्मचारी असलेले पती-पत्नी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
नांदेड जिल्हयातील धर्माबादजवळ कार उलटून झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला ठार झाली. पोलीस अधिकारी असलेले पती, पत्नी जखमी झाले. परभणी येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, त्यांचे पती पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव आणि त्यांची आई असे तिघे जण तेलंगणातील बासर येथे जात होते.
धर्माबादजवळच्या गोलाई येथील वळणावर त्याची भरधाव कार उलटली. या अपघातात नीलाबाई राठोड यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी असलेले पती,पत्नी आणि चालक असे तिघे जखमी झाले. जखमीवर उपचार सुरू आहेत.
दुसरा अपघात, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी इभाडपाडा येथे झाला. दुचाकी आणि आर्टिग कारमध्ये भीषण अपघात झाला. महामार्ग क्रॉसिंग करून गुजरात वाहिनीने गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव आर्टिग कारने दुचाकीस्वारांना धडक दिली. भीषण अपघात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाती मृत्यू झालेले तिघेही नाशिक जिल्ह्यातील हरसूल बारीमाळ येथील रहिवासी आहेत. छत्री बनविणाऱ्या संजान कंपनीमध्ये कामासाठी जात असताना अपघात घडला. नाशिक हरसूल बारिमाळ येथील सुनील वाडकर, किशोर कामडी आणि विक्रम कामडी अशी मृतकांची नाव आहेत.