अकोल्यात दारूविक्री विरोधात महिला आक्रमक; वाहतूक करणाऱ्याची दुचाकीसह दारू पेटवली!

महिलांनी गावात दारू साठा घेऊन येणाऱ्याची गाडीसह दारुची पेटी ( liquor box with car) पेटवत एल्गार केला. आगामी सण, उत्सव असल्याने गावात शांतता नांदावी (Peace be upon you) त्यासाठी महिलांनी थेट संतप्त झाल्या. दारू विक्रेत्याची दारूसह गाडी पेटवून दिली.

अकोल्यात दारूविक्री विरोधात महिला आक्रमक; वाहतूक करणाऱ्याची दुचाकीसह दारू पेटवली!
अकोल्यात महिलांनी अशाप्रकारे दारुची वाहतूक करणारे वाहन जाळून टाकले. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 3:32 PM

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या भंडारज येथे अवैध धंद्यांना ऊत आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांचा धुमाकूळ सुरू आहे. याविरोधात महिलांनी आंदोलन केली. निवेदने दिली. मात्र गावातील दारू बंद झाली नाही. अखेर महिलांनी गावात दारू साठा घेऊन येणाऱ्याची गाडीसह दारुची पेटी ( liquor box with car) पेटवत एल्गार केला. आगामी सण, उत्सव असल्याने गावात शांतता नांदावी (Peace be upon you) त्यासाठी महिलांनी थेट संतप्त झाल्या. दारू विक्रेत्याची दारूसह गाडी पेटवून दिली. वाढत्या अवैध धंद्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली आहे. अनेकांचे दारूच्या व्यसनापायी संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादमुळे (police blessings) येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचा आरोप महिलांनी केलाय.

विक्रेत्याला सुनावले होते

दारुपायी कित्तेक संसार उद्ध्वस्त झाले. पण, पिणारे काही सुधरेणा. गावात शांतता राहावी, राम नामाचा जप व्हावा, अशी महिलांची इच्छा. मात्र, मद्यपींमध्ये काही सुधारणा होत नव्हती. विक्रेत्याला महिलांनी बजावले. आमच्या संसारात विष कालवू नको, असं वारंवार सांगितलं. पण, तोही एकेचिना. शेवटी महिलांना एल्गार फुकारला.

दारुसाठी घेऊन येणारी गाडी पेटविली

दारुसाठी घेऊन येणारी गाडी महिलांनी थांबविली. काही महिला एकत्र आल्याने त्यांना हिंमत आली. हा विक्रेता आपले काय बिघडविणार, असं त्यांना वाटले. विक्रेत्याची गाडी थांबविली. माचीसची काडी काढली. गाडी पेटविली. गाडीसोबत दारूही पेटविली. गाडी पेटून राख झाली. तेव्हा कुठे महिला शांत झाल्या. यानंतर दारु विकल्यास तुलाही पेटवू अशी धमकीच या महिलांनी दिली. या रणरागिणींचा अवतार पाहून मद्यपींना चांगलीच धडकी भरली.

Video Sharad Pawar | शरद पवार यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी, अमरावतीच्या दिशेने रवाना

Nagpur Vaccination | नागपूर मनपा क्षेत्रात लसीकरण, 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Buldana Jobs | रोजगार निर्मितीत बुलडाणा जिल्हा विदर्भात अव्वल, 10 लाख रोजगाराच्या संधी केल्या उपलब्ध

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.