कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये महामोर्चा, काय मागण्या?

यवतमाळम ध्ये शेकडोंच्या संख्येने हिंदू कार्यकर्ते जमा मोर्चाच्या ठिकाणी होते. पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला.

कालिचरण महाराजांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये महामोर्चा, काय मागण्या?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 12:21 PM

विवेक गावंडे, यवतमाळः हरिद्वार येथील धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजांच्या (Kalicharan Kaharaj) नेतृत्वात आज यवतमाळमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यातील पुसदमध्ये आज हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. कालिचरण महाराजांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

लव्ह जिहाद, गो हत्या बंदी, धर्मांतर कायद्याच्या मागणीसाठी हा हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. पुसद येथील शिवाजी चौक परिसरातून हा मोर्चा निघाला. आमदार निलेश नाईक यांनीही मोर्चात सहभाग नोंदवला.

श्रीराम चंद्राच्या कृपेने सकल हिंदु समाजाने हा मोर्चा काढल्याची प्रतिक्रिया निलेश नाईक यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. गोवंश हत्या बंदी, लव्ह जिहाद तसेच धर्मांतराच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं निलेश नाईक यांनी सांगितलं.

जातीयवाद तोडा, वर्णवाद तोडा, सनातनवाद जोडा… सगळ्या हिंदूंनी एक व्हावं आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया कालिचरण महाराजांनी मोर्चाच्या वेळी दिली.

कालिचरण महाराज हे विदर्भातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. ते मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची गोडी कमी होती. पण काही काळानंतर त्यांना अध्यात्माची आवड लागली. नंतर ते इंदूरमध्ये भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले. २०१७ मध्ये ते अकोल्यात परतले आणि त्यांनी महानगर पालिकेची निवडणूक लढवली. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला…

वयाच्या दहाव्या वर्षी अपघातात माझा एक पाय तुटला होता. मात्र कालीमातेने प्रकट होऊन माझा पाय जोडला, असा दावा त्यांनी केलाय. लहानपणापासूनच कालीमातेचा मी धावा करायचो, असंही ते वारंवार सांगत असतात. मध्य प्रदेशच्या एका मंदिरात त्यांनी गायलेल्या शिवतांडव स्तोत्राचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.