साडी-चोळी, सोन्याचे दागिने; महिला शिपायाचा निरोप समारंभ, उपअधीक्षकांनी गाडी चालवत ढोरे मावशींना घरी सोडलं

माणुसकी जपणाऱ्या या सत्कारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढून कार्यालयातील एकता आणि समभाव वाढीस लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

साडी-चोळी, सोन्याचे दागिने; महिला शिपायाचा निरोप समारंभ, उपअधीक्षकांनी गाडी चालवत ढोरे मावशींना घरी सोडलं
यवतमाळमधील महिला शिपायाचा अनोखा सत्कार
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 1:08 PM

यवतमाळ : यवतमाळमधील पुसद भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांनी महिला शिपायाचा निरोप समारंभ अनोख्या पद्धतीने पार पाडला. साडी चोळी-बांगडी, सोन्याचे दागिने घडवून बळवंत मस्के यांनी निवृत्त झालेल्या शिपाई सरस्वती ढोरे यांचा सन्मान केला. त्यानंतर स्वतः कार चालवत मस्केंनी ढोरे यांना घरी सोडले.

साडी चोळी आणि सोन्याचे दागिने

कोणत्याही कार्यालयातला शिपाई म्हटलं, की त्याच्या प्रती केवळ काम करण्यापुरती सहानुभूती असते. परंतु आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना शिपाई पदावरुन दाखवलेल्या तत्परतेमुळे अधिकाऱ्यांनाही जन सुविधा पुरवण्यासाठी सहकार्य होते, याचीच जाणीव पुसद भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक बळवंत मस्के यांना दिसते. त्यामुळे निवृत्त झालेल्या शिपाई श्रीमती सरस्वती ढोरे (राहणार घाटोडी) यांचा यथोचित सत्कार त्यांनी केला. ढोरे मावशींचा साडी चोळी-बांगडी, सोन्याचे दागिने बनवून सन्मान केला. त्यानंतर उपअधीक्षक मस्केंनी ढोरे यांना चारचाकी गाडीत बसवत घाटोडी येथील त्यांच्या घरी स्वतः वाहन चालवून पोहोचवले.

सत्कारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह

माणुसकी जपणाऱ्या या सत्कारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा उत्साह वाढून कार्यालयातील एकता आणि समभाव वाढीस लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आपल्या शिपाई पदाच्या कार्याप्रती अगदी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या ढोरे मावशी अगदी सर्वांची मनोभावे हसतमुखाने सेवा करत होत्या, हे येथे विशेष उल्लेखनीय. बळवंत मस्के यांच्या कर्मचाऱ्यांबाबत आदर भावना पाहून इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा असा आदर्श ठेवून शासकीय कर्तव्य चांगल्या पद्धतीने आणि तत्परतेने पार पाडण्यासाठी उपयोगात आणावे, अशी भावना या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

सेवानिवृत्त पोलिसाला मंत्र्यांचा सॅल्युट, यशोमती ठाकुरांच्या सॅल्युट मागील इनसाईड स्टोरी नेमकी काय?

Video : अजित पवारांकडून उस्मानाबादेत माणुसकीचं दर्शन, मुसळधार पाऊस सुरु असल्याने ‘गार्ड ऑफ ऑनर’ नाकारला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.