मुसळधार पावसाने गोदामातील 30 हजार साखरेची पोती भिजली, कोट्यवधी रुपयांचं नुकसान
बीडच्या केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने, 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. (Yedeshwari Sugar Factory beed 15 thousand Quintal Sugar Wastage Due To Heavy Rain)

बीड : राज्यात मान्सूनचं (Mansoon update) आगमन झालंय. राज्याच्या विविध भागांत मान्सून सरी कोसळत आहे. मात्र काही भागांत पावसाने सुरुवातीलाच कहर दाखवायला सुरुवात केली आहे. बीडच्या केज तालुक्यात मुसळधार पाऊस पडलाय. परिणामी केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या गोदामामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने 30 हजार साखरेचे पोते पाण्यानं भिजली आहेत. यामध्ये पंधरा हजार क्विंटल साखर भिजल्याने करोडो रुपयांचं नुकसान झालंय. (Yedeshwari Sugar Factory beed 15 thousand Quintal Sugar Wastage Due To Heavy Rain)
पॅकिंग करुन गोदामात स्टोअर केली होती साखर
येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. हीच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेलीय.
अर्ध्या तासांत 132 मिमी पावसाची नोंद
गोदामातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कामगार प्रयत्न करत होते. अर्ध्या तासात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. पाणी काढण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या. सध्या पाणी काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरुच आहेत. जवळपास हे काम पूर्ण होत आलंय.
कारखान्याचे संचालक काय म्हणाले?
कारखान्याचे कार्यकारी संचालक बजरंग सोनवणे यांनी या घटनेची माहिती प्रसार माध्यमांना दिलीय. जवळपास 51 हजार होते खराब होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचा लहरीपणा
मान्सूनने या वेळी अत्यंत झोकात आणि वेगात आगमन केले. अपेक्षेपेक्षा आधीच त्याने कोकण, मुंबई आणि परिसरात प्रवेश केला. राज्याच्या इतरही काही भागांत मृगाच्या पहिल्या सरींनी कृपावृष्टी केली. त्यामुळे बळीराजाही सुखावला आणि नद्या-नाल्यांनाही पाणी आले. मुंबईला तर पहिल्याच पावसाने भविष्यातील तडाख्यांची चुणूक दाखवली. मान्सूनचा उत्तरेकडील विस्तार आणि प्रवासदेखील वेगाने होत आहे. मान्सूनचे आगमन ते येथपर्यंतचे चित्र असे दिलासादायक असले तरी तीन-चार दिवसांतील घडामोडी झोकात आलेला मान्सून पुन्हा त्याच्या लहरीपणाकडे झुकतो की काय, अशी शंका निर्माण करणाऱ्या आहेत.
(Yedeshwari Sugar Factory beed 15 thousand Quintal Sugar Wastage Due To Heavy Rain)
हे ही वाचा :