शिवसेनेनं रामदास कदम यांना भरपूर दिलं,ऑडिओ क्लिपचा विषय संपला, योगेश कदम यांचं विधानपरिषदेबाबत सूचक वक्तव्य

| Updated on: Nov 05, 2021 | 11:19 AM

शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्या नाराजीबाबत आमदार योगेश कदम यांनी पहिल्यांदाच सूचक वक्तव्य केलंय. आमदार योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

शिवसेनेनं रामदास कदम यांना भरपूर दिलं,ऑडिओ क्लिपचा विषय संपला, योगेश कदम यांचं विधानपरिषदेबाबत सूचक वक्तव्य
योगेश कदम रामदास कदम उद्धव ठाकरे
Follow us on

रत्नागिरी: शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्या नाराजीबाबत आमदार योगेश कदम यांनी पहिल्यांदाच सूचक वक्तव्य केलंय. आमदार योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. पक्ष श्रेष्ठी रामदास कदम यांच्यावर नाराज नाहीत, नाराजीचा प्रश्नच नाही. पक्षानं रामदास कदम यांना भरपूर दिलं, रामदास कदम यांनी पक्षासाठी झोकून काम देखील केलंय, असं योगेश कदम म्हणाले. विधान परिषदेचं तिकीट कुणाला द्यायचं हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय मान्य असेल, असं योगेश कदम म्हणाले आहेत.

ऑडिओ क्लिपचा विषय संपला

वयाच्या 18 वर्षापासून रामदास कदम यांनी एकनिष्ठेनी काम केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे नेतेपद दिलं. त्यामुळे ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांनी खुलासा केलाय. ऑडिओ क्लिपचा विषय आमच्यासाठी संपलाय त्यामुळे पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचा प्रश्नच उदभवद नाही, असा खुलासा शिवसेना आमदार योगेश कदम यांनी टीव्ही 9 मराठी शी बोलताना केलाय.

निवडणूक लढवणार नसल्याची 2018 लाच घोषणा

रामदास कदम यांची विधानपरिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपतेय. त्यांच्या जागी कुणाला तिकिट द्यायचे याचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. रामदास कदम यांनी 2018 साली दसऱ्या मेळाव्याच्या आधी यापुढे कुठली निवडणुक लढवणार नाही असं जाहrर केलं होतं. मंत्री असतानाच पत्रकार परिषद घेत जाहीरपणे या संदर्भातील खुलासा त्यांनी केला होता. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही आणि पद घेणार नाही, असं ते म्हणाले होते याची आठवण योगेश कदम यांनी करुन दिली. माझ्याकडची पद तरुणांना दिली जावीत तसेच निवडणुकीत तरूणांना संधी देण्यात यावी असं रामदास कदम म्हणाले होते. त्यामुळे या संदर्भात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय़ घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं आमदार योगेश कदम यांनी सष्ट केलं. आमच्यासाठी शिवसैनिक हेच महत्वाचे पद आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमच्याकडे पाहताना रामदास कदम यांचे चिरंजीव म्हणूनच पाहतात, असंही योगेश कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे आमच्यावर प्रेम आहे आणि आदित्य ठाकरे यांचे वेगळं नातं आहे. आमच्या संबधामध्ये विरोधकांनी कटुता आणण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात कधीच यश येणार नाही, असं सष्टीकरण शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दिलंय.

इतर बातम्या:

Summons to Rishikesh Anil Deshmukh : अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत, मुलगा ऋषिकेशला समन्स, नागपुरातील घराबाहेर शुकशुकाट

PM Modi at Kedarnath | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात पूजा पाठ

Yogesh Kadam said Shivsena gave lot to Ramdas Kadam we will follow decision of Uddhav Thackeray