Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

योगी आदित्यनाथ हे मुंबईत यासाठी दाखल झाले आहेत, अमोल मिटकरी यांचा नेमका आरोप काय?

आज युपी आणि गुजरात सरकार महाराष्ट्र आपल्यासमोर लुटून नेतोय, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली.

योगी आदित्यनाथ हे मुंबईत यासाठी दाखल झाले आहेत, अमोल मिटकरी यांचा नेमका आरोप काय?
अमोल मिटकरी
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 6:28 PM

अकोला : योगी आदित्यनाथ हे आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. नेमके योगी आदित्यनाथ हे नेमके मुंबईत कश्यासाठी आले आहेत. हा प्रश्न सर्वांना पडला असताना दुसरीकडे योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. एकीकडे कर्नाटक सरकारचं लक्ष मुंबईकडे आहे. दुसरीकडे गुजरात सरकार हे मुंबईतले प्रकल्प हे गुजरातला नेत आहे. आता मुंबईची सिनेसृष्टी ही युपीला नेण्याचा ध्यास धरलाय. ही सिनेसृष्टी युपीला नेऊन महाराष्ट्र लुटायला योगीनाथ मुंबईला आले आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे-फडणवीस यांचं अनैतिक सरकार आलं तेव्हापासून गुजरात, उत्तरप्रदेशला येथे काम करायला स्कोप मिळालाय. राज्यपाल कोश्यारी मध्यंतरी म्हणाले होते, गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात राहिले नाही, तर महाराष्ट्राला कोणी विचारणार नाही.

आता उरलेल्या मराठी माणसांचा घास वेदांत, फॉक्सकॉननं पळविला. सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले. गुजरातमध्ये भाजपला यश मिळालं. आता राहिली चित्रपट सृष्टी ती लुटायला योगी आदित्यनाथ आलेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

एक काळ असा होता की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर स्वारी केली. आग्रा येथे तलवारीचं पाणी दाखविलं. आज युपी आणि गुजरात सरकार महाराष्ट्र आपल्यासमोर लुटून नेतोय, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली.

गुजरातच्या लोकांनी आधी प्रकल्प नेले. ती सुरुवात होती. आता उत्तरार्ध उत्तर प्रदेश करत आहे. मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशला नेण्याचा घाट योगी आदित्यनाथ यांच्याकडून चालविला जातोय.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.