Vasai Youth Drowned : वसईत खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू, आठवडाभरातील दुसरी घटना

वसईच्या भोयदापाडा परिसरात रविवारी सायंकाळीच्या सुमारास 4 ते 5 मित्र खदानीत पोहण्यासाठी गेले होते. खदानीच्या किनाऱ्यावर बसून सर्वांनी आधी पार्टी केली. नंतर पोहण्यासाठी खदानीत उड्या मारल्या. पाण्यात उडी घेताच अजित बुडाला. या घटनेबाबत वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तरुणाचा शोध सुरु केला.

Vasai Youth Drowned : वसईत खदानीत बुडून तरुणाचा मृत्यू, आठवडाभरातील दुसरी घटना
वसईत खदानीत बुडून तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 4:19 PM

वसई : खदानी (Mine)त पोहण्यासाठी गेलेल्या तरुणा (Youth)चा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना वसईत उघडकीस आली आहे. अजित निषाद असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तब्बल 12 उलटून देखील अजितचा अद्याप शोध लागला नाही. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल असून, तरुणाचा शोध घेत आहेत. खदानीत बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षभरात 6 ते 7 तरुण या खदानीत बुडाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने खदानीत पोहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना रोखावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

खदानीत पोहण्यासाठी मित्रांचा ग्रुप गेला होता

वसईच्या भोयदापाडा परिसरात रविवारी सायंकाळीच्या सुमारास 4 ते 5 मित्र खदानीत पोहण्यासाठी गेले होते. खदानीच्या किनाऱ्यावर बसून सर्वांनी आधी पार्टी केली. नंतर पोहण्यासाठी खदानीत उड्या मारल्या. पाण्यात उडी घेताच अजित बुडाला. या घटनेबाबत वसई विरार महापालिकेच्या अग्नीशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तरुणाचा शोध सुरु केला. मात्र 12 तास उलटले तरी अद्याप तरुणाचा पत्ता लागला नाही. अग्नीशमन दलाकडून सर्च मोहिम सुरु आहे. तरुण बुडण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

शहापूरमध्ये 9 वर्षाची चिमुरडी खदानीत बुडाली

खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकी पाण्यात बुडाल्याची घटना रविवारी शहापूर तालुक्यात उघडकीस आली. या घटनेत 9 वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला तर आईला वाचवण्यास यश आले आहे. वर्षा पवार असे आईचे नाव आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील पवार कुटुंब कामधंद्यानिमित्त शहापूर तालुक्यात राहतात. रविवारी वर्षा पवार या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 9 वर्षाची मुलगीही गेली होती. यावेळी मुलगी पाय घसरुन पाण्यात पडली. मुलीला बुडत असताना पाहून आईने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यावेळी आईचा आरडाओरडा ऐकून पाड्यावरचे लोक धावत आले. लोकांनी मायलेकीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने मुलीचा मृत्यू झाला तर आईला वाचवण्यात यश आले. आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Young man drowns in Vasai mine, second incident of the week)

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.