AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीला वाचवण्यासाठी चार तरुणांच्या बंधाऱ्यात उड्या, एकाचा मृत्यू, मुलगी सुखरुप

मुलगी तिच्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बंधाऱ्याच्या कठड्याला दुचाकी धडकली. त्यामुळे मुलगी थेट बंधाऱ्यात पडली.

मुलीला वाचवण्यासाठी चार तरुणांच्या बंधाऱ्यात उड्या, एकाचा मृत्यू, मुलगी सुखरुप
Satara youth drown
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 2:04 PM

सातारा : बंधाऱ्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. सातारा (Satara) जिल्हयातील फलटण तालुक्यातील कांबळेश्वरनगर इथं ही धक्कादायक घटना घडली. सुदैवाने मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरता हळहळ व्यक्त केली जात आहे. जयेश संतोष भिसे (Jayesh Bhise) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. (Youth Jayesh Bhise died while trying to save drowning girl at Phaltan Satara )

संबंधित मुलगी तिच्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होती. त्यावेळी बंधाऱ्याच्या कठड्याला दुचाकी धडकली. त्यामुळे मुलगी थेट बंधाऱ्यात पडली. हे दृश्य पाहून जवळच असलेल्या चार तरुणांनी तिला वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उड्या घेतल्या. मात्र त्यापैकी एक तरुण बुडाला.

या तरुणाला शोधण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम बोलवावी लागली. या टीमने बंधाऱ्यातून जयेश भिसेला शोधून काढलं. मात्र दुर्दैवाने बुडून त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, बंधाऱ्यात पडलेली मुलगी सुखरुप आहे. शिवाय अन्य तीन युवकही ठिक आहेत. पण एका तरुणाचा मृत्यू झाला.

सांगलीतही तीन मुलं वाहून गेली

तिकडे सांगलीतही अशीच धक्कादायक घटना घडली. आटपाडी तालुक्यात घाणंद नावाचं गाव आहे. याच गावात तीन भावंडं कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली. काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीन भावंडांपैकी एकाच मृतदेह आज सकाळी सापडला आहे. दोन सख्ख्या भावंडांचा मात्र शोध सुरु आहे

संबंधित बातम्या 

एक फोन आला, बापाची नजर हटली, तीन मुलं वाहून गेली, ‘लुशी’चं काय झालं? सांगली हादरली

काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.