Buldana Youth drowned : बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू, NDRF च्या जवानांनी शोधून काढला मृतदेह

बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेय. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलीय तर काही शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचल्यामुळे बांध फुटले.

Buldana Youth drowned : बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू, NDRF च्या जवानांनी शोधून काढला मृतदेह
बुलडाण्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यूImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 4:21 PM

बुलडाणा : साखरखेर्डा येथील रतन तलावात बुडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. गणेश बाबुराव दानवे (Ganesh Danve) असे मृत युवकाचे नाव आहे. तो साखरखेर्डा (Sakharkharda) गावातीलच एका वृध्द महिलेच्या अंत्यसंस्कारसाठी या तलावाजवळील स्मशानभूमीत (Crematorium) गेला होता. मात्र अंत्यसंस्कार झाल्यावर त्याला या तलावात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. यावेळी तो तलावात खोल पाण्यात बुडला. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखर्डा येथील मृत गणेश दानवे हा युवक गावाच्या बाहेर असलेल्या रतन तलावाशेजारी अंत्यसंस्कारसाठी गेला होता. मात्र स्मशानभूमी शेजारी असलेल्या तलावात अंघोळ करायला गेला असता तो पाण्यात बुडला. यावेळी काही युवकांनी त्याला विरोधही केला. परंतु, कुणाचेही न ऐकता सरळ तो तलावात काही अंतरावर चालत गेला. आपण सहज पुढच्या काठावर जाऊ शकतो, असा भ्रम त्याला झाला असावा. तलावाच्या मधोमध जात नाही, तोच गणेश पाण्यात बुडाला. तलावाची पातळी खोलवर असल्याने शोध घेऊनही तो मिळून आला नाही. गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे 13 जुलैला गणेशचा मृतदेह तलावात सापडला नव्हता. पावसामुळे शोध कार्यात ही अडथळा येत होता. परंतु काल एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम राबवली. तलावात असलेल्या युवकाचा मृतदेह त्यांना सापडला.

संग्रामपूर तालुक्यामध्ये शेतीचे मोठं नुकसान

बुलडाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सततच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेय. अनेक ठिकाणी शेती खरडून गेलीय तर काही शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचल्यामुळे बांध फुटले. यामुळे शेती खरडून गेलीय. सोबत पीकही वाहून गेलीत. मोठं आर्थिक नुकसान झालंय. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ही अशीच परिस्थिती आहे. सततच्या पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. शेतातली पीक सडण्याच्या मार्गावर आहेत. शेतात तणनाशक फवारणी, निंदन, डवरे, काहीच काम चालत नसल्यामुळे पिके ही धोक्यात आलीय. हातमजुरी करणाऱ्या मजुरांचे पण हाल होत आहेत. शासनाकडून मदतीची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले

गेल्या अनेक वर्षांपासून सवडद येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. दरवर्षी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. गावातील भाविक ही दररोज दर्शनासाठी मंदिरात येतात. आषाढी एकादशीच्या दिवशी गावांतील नव्हे तर परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशी संपताच दररोजच्या पावसाने 13 जुलैला दुपारी मंदिर अचानक कोसळले. सुदैवाने मंदिरात कुणी भाविक नसल्याने मोठा अनर्थ टळला. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळल्याने या मंदिरासाठी आता गावातील पुन्हा दानशूर हात पुढे आले आहेत. लवकरच हे मंदिर पुन्हा उभे राहणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. मात्र शासनानेसुद्धा मदत करावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केलीय.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.