पहाटेच्या शपथविधीवर नवीन गौप्यस्फोट, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यालाही माहीत होता विषय

| Updated on: Feb 17, 2023 | 5:26 PM

संजय राऊत यांनी पाप केले आहे म्हणून ते भारडी देवीला जाणार नाही आणि गेले तरी परत येणार नाही, अशी भीती संजय राऊत यांच्या मनात आहे.

पहाटेच्या शपथविधीवर नवीन गौप्यस्फोट, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यालाही माहीत होता विषय
Follow us on

औरंगाबाद : भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2019च्या पहाटेच्या शपथविधीवर मोठा गौप्यस्फोट केला होता. टीव्ही ९ मराठीच्या व्यासपीठावर बोलताना पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच झाल्याचा दावा केला होता. या संदर्भात थेट शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असे त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारण हादरुन गेले. हे हादरे अजूनही बसत आहेत. आता शिवसेनेच्या मोठ्या नेत्यालाही यासंदर्भात माहिती होती, असा दावा ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.

काय म्हणाले संजय शिरसाट

हे सुद्धा वाचा

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, अजित दादा हे ज्येष्ठ राजकारणी आहेत त्यांचा आम्ही सर्वजण आदर करतो.अजितदादा यांचे संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमच्याहून चांगले आहेत.

संजय राऊत हा साधासुधा माणूस नाही. हे सत्तांतर झाले ते सहजासहजी झाले नाही. संजय राऊत हे दुप्पटी व्यक्तीमत्व आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये सत्तांतरासंदर्भात जे वक्तव्य केले, त्यापुढे जाऊन मी सांगतो, हा सर्व प्रकार संजय राऊत यांना माहीत होता. शरद पवार आणि संजय राऊत यांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना कळाले आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर शपथविधी सोहळा पाहिला होता.

राऊत यांचे मन साफ नाही

संजय राऊत अगोदर ही म्हणाले होते की, कामख्या देवी आम्हाला पावणार नाही. पण देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार आले. संजय राऊत यांनी पाप केले आहे म्हणून ते भारडी देवीला जाणार नाही आणि गेले तरी परत येणार नाही, अशी भीती संजय राऊत यांच्या मनात आहे. परंतु आमचे मन साफ आहे. आम्ही महाराष्ट्राचे कल्याण करण्याच्या भूमिकेत आहोत, असे संजय शिससाट यांनी केला.

फडणवीस काय म्हणाले होते

माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते तेव्हा ते टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी नंबर लक्षात आला की आपल्याला मुख्यमंत्री होता येईल. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे विश्वासघात त्यांनी केला.