बस चालकाचा जामीन अर्ज फेटाळल्याने समोर आली धक्कादायक बाब; नाशिकच्या पळसे येथे झाला होता विचित्र अपघात
उईके यांच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती, या विचित्र अपघातात राजेंद्र यांनी एका कारला, दोन दुचाकीला आणि एका बसला पाठीमागील बाजूने धडक दिली होती.
नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावर 8 डिसेंबर एक मोठा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसने दोन दुचाकीला चिरडत कारसह बसला पाठीमागील बाजूने धडक दिली होती. त्यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. इतकंच काय बसमधील प्रवासी जखमी झाले होते, त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आल्याने प्राथमिक माहिती ही बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतिने देण्यात आलेल्या अहवालात बसचे ब्रेक फेल झालेले नव्हते, चालकाचे वेगवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची धक्कादायक समोर आली आहे. बसचा चालक राजेंद्र अंबादास उईके यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केल्याने त्यावेळी देण्यात आलेल्या अहवालात ब्रेक फेल झालेच नाही असे नमूद केले आहे. आणि त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज देखील फेटाळला आहे.
राजगुरू नगर येथील रहिवासी असलेले राजेंद्र अंबादास उईके हे दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान नाशिकहून पुण्याच्या दिशेने बस घेऊन चालले होते, त्यात प्रवासी बसलेले होते.
उईके यांच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती, या विचित्र अपघातात राजेंद्र यांनी एका कारला, दोन दुचाकीला आणि एका बसला पाठीमागील बाजूने धडक दिली होती.
यामध्ये दुचाकीवरील दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता, त्यात मामा-भाच्याचा जागेवर मृत्यू झाला होता, त्यामुळे या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात होती, त्यात बसचालकाची चुक् नसल्याचे सांगण्यात येत होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाच्या चौकशी समितीने अपघाताची चौकशी करत अहवाल कोर्टात सादर केला होता, त्यामध्ये ही धक्कादायक बाब समोर आल्याने न्यायालयाने बसचालकाचा जामीन अर्ज देखील फेटाळला आहे.