या चार जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ, 16 मेंढ्या दगावल्या, पीकाचं नुकसान
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
पालघर : अवकाळी पावसाने विजांचा कडकडाटासह पालघर (palghar) जिल्ह्यात मुसळधार (heavy rain) हजेरी लावली असून पालघर जिल्ह्यात पुढील तासभर विजांच्या कडकडाटच प्रमाण वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून डहाणू सह परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात 4 मार्च ते 6 मार्च दरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. रात्री जिल्ह्यात मुसळधार झालेल्या पावसाने पहाटे काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील बागायतदार आणि फळ भाजी उत्पादक शेतकरी (farmer) मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. विशेष म्हणजे तर काही ठिकाणी वीज पडण्याच्याही सुध्दा घटना घडल्या आहेत. बुलढाण्याच्या शेजारी असलेले साखळी नावाच्या गावात वीज पडल्याने मेंढपाळाच्या तब्बल 16 मेंढ्या दगावलेल्या आहेत. तर पाच ते सहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. महसूल विभागाकडून पंचनामा सुरू आहे. मात्र मेंढपाळ यांचं मोठ नुकसान झाल्याचे पाहायला मिळते आहे.
शहरासह जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नाशिक शहर आणि जिल्ह्यात रात्रभर जोरदार अवकाळी पाऊस झाला. शहरात मध्यरात्री 2 वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मात्र या अवकाळी पावसाने आता पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत आले असून, ग्रामीण भागात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, द्राक्षे आणि कोबी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या होळीच्या उत्सवावर देखील पावसाचे सावट असून, आज आणि उद्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज सकाळी देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे.