आधी श्रीनिवास वनगा अन् आता कुटुंबही गायब, पालघरमध्ये नेमकं काय घडतंय?

पालघरचे शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा 36 तास बेपत्ता असल्यानंतर घरी परतले, पण नंतर त्यांचे कुटुंबही गायब झाले. आमदारकीचे तिकीट नाकारल्याने ते निराश झाले आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आधी श्रीनिवास वनगा अन् आता कुटुंबही गायब, पालघरमध्ये नेमकं काय घडतंय?
श्रीनिवास वनगा
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 2:07 PM

Srinivas Vanaga Family Missing : गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे. महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी आले. त्यांनी त्याच्या पत्नीशी चर्चा केली आणि ते पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे विश्रांतीसाठी गेले, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. मात्र आता श्रीनिवास वनगा यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबही गायब झाले आहे.

पालघरचे नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा हे 36 तासांनी आपल्या घरी परतले. यानंतर ते पुन्हा एकदा मित्रांसोबत बाहेर गेले. यामुळे कुटुंबीयांची चिंता मिटली होती. त्यांची पत्नी सुमन वनगा यांनी श्रीनिवास वनगा विश्रांतीसाठी नातेवाईकांकडे गेल्याचे सांगितले होते. विश्रांतीनंतर ते काही दिवसांनी घरी परततील. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील, अशी माहिती कुटुंबियांनी दिली होती.

श्रीनिवास वनगा यांचे घर बंद

श्रीनिवास वनगा हे मित्रासोबत बाहेर गेल्यानंतर आता त्यांचे कुटुंबियही गायब असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या घरी कोणीही नसून त्यांच्या घराला कुलूप आहे. श्रीनिवास वनगा यांचे घर बंद आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मात्र त्यांचे कुटुंबिय घरी नसल्याने हे सर्वजण नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

हे सुद्धा वाचा

वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नाही – श्रीनिवास वनगा

शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर गेल्या 36 तासांपासून ते अज्ञातवासात गेले होते. यानंतर आता वनगांचा कुटुंबयाशी संपर्क झाल. मध्यरात्री तीन वाजता श्रीनिवास वनगा हे घरी येऊन पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा हे तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे पत्नीने स्पष्ट केले आहे.

पुढची राजकीय भूमिका काय?

श्रीनिवास वनगा हे आपल्या पुनर्वसनाच्या चिंतेत आहेत. त्यामुळे ते 36 तासांपासून अज्ञातवासात गेले आहेत. विश्वास ठेवलेला एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उमेदवारी दिली नसल्याने मी व्यतीत झालो आहे आणि त्यामुळे मला आरामाची गरज आहे, असं सांगून श्रीनिवास वनगा आपल्या काही मित्रांसोबत पुन्हा माघारी केल्याची माहिती समोर आली आहे .त्यामुळे नॉट रिचेबल असलेले वनगा आता कुटुंबियांच्या संपर्कात आल्याचा पाहायला मिळतंय. यामुळे कुटुंबियांचं पोलिसांची चिंता आता काहीशी कमी झाली आहे. मात्र घरी परतलेले वनगा आपल्या मित्रांसोबत परत कुठे गेले हे आपल्या पत्नीला देखील त्यांनी सांगितलेलं नाही. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा आता पुढे आपली राजकीय भूमिका काय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.