कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलाखाली पंचगंगा नदीपात्रात अजस्त्र मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती

पुलावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारक आणि नागरिक तसेच शेतकरी यांना पंचगंगा नदीपात्रात 8 फूट लांबीची भली मोठी मगर जलविहार करताना दिसून आली.

कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलाखाली पंचगंगा नदीपात्रात अजस्त्र मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये भीती
कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलाखाली अजस्र मगरीचे दर्शन
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:24 PM

कोल्हापूरः कुरुंदवाड-नृसिंहवाडी दरम्यान असलेल्या यादव पुलाखाली पंचगंगा नदीपात्रात (Panchganga River) आज सकाळी अजस्त्र मगरीचे (crocodile) आज दर्शन झाले. पंचगंगा नदीपात्रात सुमारे आठ फूट लांबीची मोठी मगर पाण्यातून जात असल्याचे दिसताच पुलावरुन (Bridge) मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसली. या नदीपात्रात नृसिंहवाडीला येणारे अनेक भक्त अंघोळीसाठी उतरत असल्याने मगरीमुळे आता भीतीचे वातावरण पसरले आहे.

यावेळी पुलावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारक आणि नागरिक तसेच शेतकरी यांना पंचगंगा नदीपात्रात 8 फूट लांबीची भली मोठी मगर जलविहार करताना दिसून आली.

परिसरात भीतीचे वातावरण

नदीपात्राजवळ राहणाऱ्या महिला, पुरुष या नदीपात्रातील पाण्याचा नेहमी वापर करतात. पुरुष मंडळींचीही पोहण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. त्यामुळे भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. या नदी पात्राशेजारीही शेतीचा मोठा परिसर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचीही मोठी ये जा या नदीकाठावरुन होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या मगरीचा धोका वाटत असल्याने वन विभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सतर्कतेचा इशारा

या नदीपात्रात अगदी जवळच श्री क्षेत्र नृसिंहवाडीत हजारो भक्त येत असतात. अनेक जण येथे अंघोळीसाठी उतरत असल्याने आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 नदी पात्राता पोहण्याऱ्यांना सूचना

नदीपात्रात आता मगरीचा वावर वाढल्याने वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. मागील काही दिवसापूर्वीही मगरीचा वावर नदी पात्रात दिसून आला होता. त्यावेळीही नागरिकांना आणि अंघोळ करणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे आताही परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारी वन विभागाकडून दिला गेला आहे.

मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.