Ashadhi Ekadashi 2021 | 20 वर्षांपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी, मुख्यमंत्र्यांसह महापूजेचा मान मिळालेलं दाम्पत्य कोण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला.
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंढरपुरात पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. यावेळी वर्धा जिल्ह्यातील कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली.
महापूजेचा मान मिळालेलं दाम्पत्य कोण?
आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.
कोलते दाम्पत्याच्या भावना
दीर्घ कालीन सेवेचे फळ महापूजेच्या निमित्ताने मिळाल्याच्या भावना कोलते दाम्पत्याने व्यक्त केल्या. महापूजेचा मान मिळाला, हे कष्टाचं फळ आहे. 2000 मध्ये कोलते पंढरपूरला आले. मात्र 1972 पासून ते वारी करत आहेत. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावा, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी यावेळी सांगितलं.
पाहा व्हिडीओ :
Video | Ashadhi Ekadashi 2021 | 20 वर्ष विणेकरी असलेल्या वर्ध्याच्या कोलते दाम्पत्याला महापूजेचा मान#Pandharpur #PandharpurWari #AshadhiEkadashi2021 #AshadhiWari
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/0wOt1cFTNH
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
मुख्यमंत्र्यांची विठुराया चरणी प्रार्थना
“मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेलं नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. pic.twitter.com/LRZfzJvzKU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2021
संबंधित बातम्या :
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न
(Pandharpur Ashadhi Ekadashi 2021 CM Uddhav Thackeray Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja with Vinekari Kolte Couple)