राहुल गांधींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले दादा?

Chandrakant Patil on Rahul Gandhi : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्ययाबाबत चंद्रकात पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

राहुल गांधींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचं सर्वात मोठं विधान; असं का म्हणाले दादा?
राहुल गांधी, चंद्रकांत पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 6:18 PM

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीनगरीकडे मार्गस्थ झालेली आहे. वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत. अशात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज पंढरपूरमध्ये आहेत. ते तिथला आढवा घेत आहेत. कोविड आला, त्यावेळेस वाटलं होतं की वारी नावाचा प्रकार संपेल… परंतू कोविडमुळे वारीत काही फरक पडला नाही. पाऊस चांगला झाल्यामुळे यावर्षी आषाढी यात्रेला 18 लाखाच्या वर भाविक येतील असा अंदाज आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी या वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा व्यवस्थित आहेत का नाही ते पाहण्यासाठी आलो आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राहुल गांधी यांच्याबाबत काय म्हणाले?

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेचे नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. उशिरा का होईना देवासमोर नतमस्तक व्हायची इच्छा निर्माण झाली. जसं जसं आपलं वय जाते तस तसे परमेश्वराची आस निर्माण होते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काँग्रेसला टोला

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत अचानक लॉटरी लागली आहे. एकचे 14 खासदार झाले आहेत. त्यामुळे ते हवेत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या 288 जागा काय सुचतात… एकला चलो काय सुचतं ठीक आहे. पण आम्ही मात्र विधानसभेला आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे सध्या मराठवाडा दौरा करत आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मनोज जरांगे पाटील सरकार वारंवार आवाहन करत आहेत. पण सगे सोयऱ्यांची अधिसूचना जी काढली आहे ती जरांगे यांनीच ड्राफ्ट केली आहे. त्या अधिसूचनेला आठ लाख हरकती आले आहेत. तीच अधिसूचना आपण काढत आहोत. या अधिसुचनेमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोठेही धक्का लागणार नाही. 2017 सालिच रक्त संबंधा मध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नोंद ज्याची सापडेल त्याला कुणबी सर्टिफिकेट मिळेल, असं चंद्रकांत पाटील म्हणले.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.