Pandharpur Bypoll Voting | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक मतदान सुरु, भालके की आवताडे, फैसला होणार

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल 2021) मतदान होत आहे. (Pandharpur Mangalwedha Bypoll Election Voting)

Pandharpur Bypoll Voting | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक मतदान सुरु, भालके की आवताडे, फैसला होणार
मतदान प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 8:19 AM

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल 2021) मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान 12 तासांचे असणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (Pandharpur Mangalwedha Bypoll Election Voting Live Update)

मतदानाची जय्यत तयारी 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल ईव्हीएम मशिनसह इतर आवश्यक सर्व साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पण जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहे.

3 लाख मतदार करणार फैसला

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात एकूण 3 लाख 2 हजार 914 मतदार आहेत. त्यात 1 लाख 43 हजार 746 महिला तर 1 लाख 59 हजार 167 पुरुष मतदार आहेत. या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी 328 मूळ मतदान केंद्र असून 196 सहायक मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट, 524 विवी पॅट मशीन, 210 कंट्रोल युनिट, 420 बॅलेट युनिट राखीव आहेत. तसेच या निवडणुकीसाठी 2552 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pandharpur Mangalwedha Bypoll Election Voting Live Update)

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान 12 तास केले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील असणाऱ्या 16 मतदान केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी स्थानिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात एकूण 22 गावे आहेत. पंढरपुरातील उरलेली गावं माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडलेली आहेत. पंढरपूरचं देवस्थान आणि पंढरपूरमधील राजकीय घडामोडींमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं सर्वाधिक वर्चस्व आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर दिला आहे.

पंढरपूर- मंगळवेढ्याचं राजकीय गणित

दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2019मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खरंतर त्यावेळी ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी भारत भालकेंनी ‘डब्ल्यू’ टर्न घेत कमळ हाती घेता-घेता अचानक राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ हाती बांधलं होतं. (Pandharpur Mangalwedha Bypoll Election Voting Live Update)

संबंधित बातम्या :

आवताडे जिंकणार की भालके? काय आहे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचं गणित? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.