Pandharpur Assembly By-Election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस, भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. (Pandharpur Mangalwedha constituency by election)

Pandharpur Assembly By-Election : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस, भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावाचाही उमेदवारी अर्ज
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 2:53 PM

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते भारत भालके(Bharat Bhalke) याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे. (Pandharpur Mangalwedha constituency by election BJP nominates samadhan awatade)

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली. या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु करण्यात आली होती. या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

भगिरथ भालके यांना उमेदवारी?

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. पोटनिवडणुकीत परिचारक गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पण परिचारक गट सध्या पोटनिवडणूक लढण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं बोललं जात आहे.

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

(Pandharpur Mangalwedha constituency by election BJP nominates samadhan awatade)

संबंधित बातम्या : 

भारत भालकेंच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?

Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.