उपोषण करून काहीही… पंकजा मुंडे यांची पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका

या मातीत माझा बाप गेला आहे. मी कधीही तुम्हाला मान खाली घालू देणार नाही. खासदार म्हणून चांगलं काम करून दाखवेल. आपल्या जिल्ह्याचा विकास करेन. बीड जिल्ह्यात उद्योग आणेल. पुढच्यावर्षी परळीपर्यंत रेल्वे आणणार आहे. आता फक्त संधी द्या. पुढच्यावेळी तुम्ही म्हणाल त्याला खासदार करेन, असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

उपोषण करून काहीही... पंकजा मुंडे यांची पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 1:28 PM

भाजपच्या बीडमधील उमेदवार पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी जरांगे यांचं नाव न घेता केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जरांगे यांच्या उपोषण काळात त्यांना समर्थन देणाऱ्या पंकजा यांनी अचानक यूटर्न घेतल्यानंतर आता जरांगे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पंकजा मुंडे या बीडमधून लढत आहेत. आज त्यांनी जाटनांदूर येथे जाहीर सभा घेतली. जाटनांदूर येथील त्यांची ही पहिलीच जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मी कधीही वेगळं वक्तव्य केलं नाही. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. मला दिल्लीत जाण्याची हौस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही माझी मागणी होती. पण कोअर कमिटीने माझं नाव घेतलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

कुणाची जात विचारली नाही

बीड जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असात मी कधीच त्याला त्याची जात विचारली नाही. प्रत्येकाला मी मदत करत आले. निवडणुकीत राजकारण आणण्याची गरज नाही. माझ्या हातात तराजू आहे, मी उज्ज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे, असं सांगतानाच नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा दावाही त्यांनी केला.

परळीपर्यंत रेल्वे येईल

यावेळी त्यांनी बजरंग सोनावणे यांच्यावर नाव न घेता टीका केली. ज्यांना 5 लाख 9 हजार मते गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली. त्यांनी काय काम केलं हे मी विचारणार नाही, असा टोला त्यांनी सोनावणे यांना लगावला. मी निवडणूक हरल्यानंतरही पाच वर्षात हजारो कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवले. माझ्या जिल्ह्यातील रस्ते चांगले केले, रेल्वे आणली. पुढच्यावर्षी परळीपर्यंत रेल्वे येईल, असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही म्हणाल त्याला खासदार करेन

मुकेश अंबानी भेटले की मला कैसी हो पंकजा म्हणून विचारतात. त्यांच्याकडून बीडमध्ये मोठे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मला बांधणारा धागा बनायचे आहे. कात्री नाही. आता मला संधी द्या. पुढच्यावेळी तुम्ही म्हणाल त्याला मी खासदार करेन. जिल्ह्याच्या विकासासाठी मला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.