Video : “माझे भाऊ.. धनू भाऊ”, पंकजा मुंडेंनी उल्लेख करताच धनजंय मुंडेंनी केलं असं काही…

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुडे आणि धनंजय मुंडे हे तब्बल १२ वर्षांनी एकत्र आले. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा खास शब्दात उल्लेख केला.

Video : माझे भाऊ.. धनू भाऊ, पंकजा मुंडेंनी उल्लेख करताच धनजंय मुंडेंनी केलं असं काही...
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 5:47 PM

Pankaja Munde Special Mention Dhananjay Munde : राज्यातील विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. त्यातच आज दसऱ्यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा नुकताच पार पाडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील भगवान गडावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे, सुजय विखे पाटील यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुडे आणि धनंजय मुंडे हे तब्बल १२ वर्षांनी एकत्र आले. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा खास शब्दात उल्लेख केला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव या ठिकाणी पार पडला. या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. यावेळी पंकजा मुंडेंनी मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे घेतली. यात त्यांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख फारच वेगळ्या पद्धतीने केला. विशेष म्हणजे यावर धनंजय मुंडेंनी फारच छान प्रतिक्रिया दिली.

मी महाराष्ट्राची वाघिण आहे वाघिण

“माझ्या पित्याची जशी मी लेक आहे, ज्यांची मी लेक आहे असे वाटते बैसूनी पाण्यावरी ती ज्ञानेश्वरी… सलाम वालेकूम. मला मुंडे साहेबांनीव वारसा दिला. त्यांना त्यांचा मृत्यू दिसत आहे असं वाटतं. गोपीनाथ मुंडे शेवटचं वाक्य या गडावरून बोलले, मला गडावरून दिल्ली मुंबई नाही, पंकजा मुंडे दिसत आहे. त्यांनी जो संदेश दिला तो मी खरा केला. मला काही करता आलं नसेल पण मी भगवान भक्तीगड निर्माण केला. ज्या मातीत भगवान बाबांचा जन्म झाला, तिथे मी आले”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

“लोक म्हणाले, ताई इथे घ्या मेळावा. मला काही लोक फोन करत होते, तुमच्या मेळाव्याला अमूक तमूक लोक येत आहे. म्हणाले, तुम्हाला इथून काढतील. मी म्हटलं आम्हाला काय, भगवान बाबांचा झेंडा घेऊन मी शेतात उभी राहील. आम्हाला काहीही फरक पडत नाही. मी महाराष्ट्राची वाघिण आहे वाघिण”, अशा शब्दात पंकजा मुंडे कडाडल्या.

माझा भाऊ… धनू भाऊ, पंकजांकडून उल्लेख

यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंबद्दल भाष्य केले. मंचावर उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे कृषिमंत्री, माझा भाऊ… धनू भाऊ, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावर धनंजय मुंडे हे गालातल्या गालात गोड हसले. त्यानंतर त्यांनी हात वर करुन सर्वांना नमस्कार केला. तर पंकजा मुंडेही मंचावर फार छान हसत होत्या.

यानंतर पंकजा मुंडे तुम्ही डीएम म्हणा, पीएम म्हणा की सीएम म्हणा…. मला काही कळंना, असे म्हणाल्या आणि जोरदार हशा पिकला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मुंडे समर्थकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आम्ही 12 वर्षानंतर एकत्र

दसरा मेळाव्यापूर्वी पंकजा मुंडेंनी तब्बल १२ वर्षांनी एकत्र येत असल्याबद्दल भाष्य केले. आम्ही 12 वर्षानंतर एकत्र येतो हे वैशिष्ट्ये नाही. ही परंपरा आहे. आमच्यासाठी आम्हाला भगवानबाबा महत्त्वाचे आहेत. आम्ही कधी एकत्र मेळावा केला नाही. गोपीनाथ मुंडे असताना आम्ही खाली बसून भाषण ऐकायचो. पण आम्ही मेळाव्या निमित्ताने कधी एकत्र आलो नाही. आता आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र एकाच मंचावर येऊन भाषणं देत आहोत. त्यामुळे मंचावर एकत्र येण्याची आम्हाला सवय लागली आहे, असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.