लेकरांच्या जेवणात चिखल, ऊसतोड कामगारांबाबत उद्याच्या उद्या निर्णय घ्या, पंकजा मुंडे आक्रमक

तुमची ही अवस्था बघून मलाही अन्न गोड लागत नाही. माझ्या घरीही सगळे गंभीर आहेत, असं पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांना म्हणाल्या. (Pankaja Munde on Migrant Workers)

लेकरांच्या जेवणात चिखल, ऊसतोड कामगारांबाबत उद्याच्या उद्या निर्णय घ्या, पंकजा मुंडे आक्रमक
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 10:16 AM

मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. (Pankaja Munde on Migrant Workers)

‘कोरोना’च्या संकट काळातच कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचाही फटका बसला. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परजिल्ह्यात अडकले आहेत. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन ट्विटरवरुन केलं आहे.

‘इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरे परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत, पंकजा मुंडेंकडून ‘मोठ्या भावा’वर स्तुतिसुमनं

तुमची ही अवस्था बघून मलाही अन्न गोड लागत नाही. माझ्या घरीही सगळे गंभीर आहेत. स्वतःची काळजी घ्या, महिला आणि पोरांना सांभाळा, नाही तर मी स्वतः उद्या तुमच्याकडे येते, मला खूप वाईट वाटत आहे’ अशा भावना पंकजा यांनी व्यक्त केल्या आहेत.

सरकारने 14 तारखेनंतर परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आता काय अडचण आहे? मीसुद्धा सकाळपासून नाराज आहे. मी खूप भांडतेय, याला-त्याला रोज फोन करत आहे, सरकारला उद्याच्या उद्या निर्णय घ्यायला भाग पाडू, असंही त्या म्हणाल्या.

भाजप नेते ठाकरे सरकारवर टीका करत असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत आहेत, अशा शब्दात ‘बहीण’ पंकजा यांनी ‘मोठ्या भावा’ला शुभेच्छा दिल्या होत्या.

‘महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देते. सध्याची ‘कोरोना’ची परिस्थिती ते व्यवस्थितपणे हाताळत आहेत, असं मला वाटतं. मी त्यांच्यावर टीका करणार नाही, तसं वाटलं तर सूचना करेन, तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे वेगळे दिसत आहेत. अगदी पेहरावाबाबतही. लोकांच्या मनात जी नेत्याबद्दल प्रतिमा असते त्यापेक्षा ते वेगळे आहेत, असंही पंकजा म्हणाल्या होत्या. (Pankaja Munde on Migrant Workers)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.