पवारांचा गेम, कडवं आव्हान, बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळताच पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनवणे यांच नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे वि. बजरंग सोनावणे हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.

पवारांचा गेम, कडवं आव्हान, बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळताच पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया काय ?
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 9:42 AM

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नव्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. बीडमध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. शरद पवार गटासोबत आमचं सकारात्मक बोलणं सुरु आहे, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं होतं. पण असं असताना शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. तर उलट अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनवणे यांच नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे वि. राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हा सामना चांगलाच रंगणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान बजरंग सोनावणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानतंर भाजपच्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बजरंग सोनावणे यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर माझी निवडणुकीची तयारी नसते तर पाचही वर्ष मी निवडणुकीसाठी तयारी करत असते. ज्या पद्धतीचा संपर्क, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणार आहे ते करत असते. प्रीतम ताई सुद्धा फिरत आहे, काम करत आहोत. ‘ असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आता आमचे मित्र पक्ष देखील काम करत आहेत. फक्त हे निमित्त आहे उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं. जसं त्यांना ( सोनावणे) वाटतं, तसं मलाही वाटतं. लाट आणि हा वेगळा विषय झाला, तुम्ही पाच वर्षे लोकांसाठी काय करता? मतदारांना भेटता की नाही या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. बीडची जनता ही फार सुज्ञ आहे आणि ती नक्कीच विचार करतील.’ अस सांगत पंकजा मुंडे यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

तिकीटांच्या अदलाबदली बद्दलही त्या बोलल्या. मी सुद्धा या चर्चा ऐकत आहे, मात्र त्या प्रक्रियेचा पूर्ण भाग नसल्यामुळे मी टीका टिपणी करणार नाही. मी माध्यमातून बघत असते आणि माध्यमातून प्रत्येक गोष्टीवर फार फार बोलणं आवश्यक नसतं, असं त्या म्हणाल्या.

ज्योती मेटे यांनी काय करावं हे त्या ठरवतील

बीडमधून निवडणूक लढवण्यास ज्योती मेटे उत्सुक आहेत. मात्र शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या आता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. . शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी ज्योती मेटे यांना आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे आता ज्योती मेटे या अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘ ज्योती मेटे यांनी काय करावं हे त्यांचं त्या ठरवतील. मी त्याबाबत काही बोलू शकत नाही. त्यांनी लढायची भूमिका ठेवली असेल तर ती त्यांची सर्वस्वी भूमिका आहे.’

आणखी कुणाकुणाला उमेदवारी जाहीर ?

शरद पवार गटाकडून भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.