‘आधी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आता बीडपुरती गृहमंत्री’, योगायोगाने दोन्ही खाती फडणवीसांची
बीड: मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता मी बीडपुरती का होईना मी गृहमंत्री आहे, असं म्हटलं आहे. परळी येथील गोपीनाथ गडावरील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला आणि बालकल्याण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी ज्या मंत्रिपदांची नावं घेतली आहेत, ती योगायोगाने […]
बीड: मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता मी बीडपुरती का होईना मी गृहमंत्री आहे, असं म्हटलं आहे. परळी येथील गोपीनाथ गडावरील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिला आणि बालकल्याण मंत्री तसेच ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी ज्या मंत्रिपदांची नावं घेतली आहेत, ती योगायोगाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत.
दरम्यान गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे म्हणाल्या, “गँगवॉर संपून महाराष्ट्रात सुरक्षा काय असते ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना दाखवून दिले. तसे बीड जिल्ह्यातील गँगवॉर बंद करण्याचं काम मी केलं आहे. बीड जिल्ह्यापुरती का होईना मी गृहमंत्री आहे”
दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरही भाष्य केलं. “ज्या राज्यात आम्ही हरलो, त्या राज्यात आम्ही चारवेळा सत्ता भोगली, त्यानंतर आमचा पराभव झाला. महाराष्ट्रातही आम्ही चारवेळा सत्ता बोघू त्यानंतर बघू. लोकसभेत आम्ही दणदणीत विजय मिळवू,पंतप्रधान आमचाच असेल”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
इतर राज्यात आम्ही सत्तेत येऊ हा विश्वास व्यक्त करताना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्ध आणि पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांची उपस्थिती होती.