राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेच दिसलं, Pankaja Munde यांची टीका
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कामकाजावर भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी नाराजी दर्शवली आहे. विरोधकांनी या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर सत्ताधाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करतानाच भाजपलाही (bjp) घरचा आहेर दिला आहे. राजीनामा मागणारे विरोधक आणि राजीनामा देणारे सत्ताधारी अधिवेशनात हेचं दिसलं. जनतेच्या प्रश्नावर अधिवेशन व्हायला पाहिजे होतं, असा टोला पंकजा मुंडे यांनी भाजपलाही लगावला आहे. वरळीतील मार्स-1 या प्री-प्रायमरी शाळेचं उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी काश्मीर फाईल्स हा सिनेमा पाहिला नसल्याचंही स्पष्ट केलं.
एकीकडे भाजप नेते द काश्मीर फाईल्स सिनेमा सर्वाना मोफत दाखवत आहेत. तसेच राज्यातील नेते हा सिनेमा टॅक्स फ्री करा अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या पक्षातील नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र हा सिनेमा पाहिलेला नाही असं स्पष्ट केलं. खुद्द माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाहीये.
केंद्रावर जनता खूष
केंद्र सरकारच्या कामगिरीवर देशातील जनता खूष आहे, असं त्या म्हणाल्या. सरकारकडे मागण्या मागायचा संघटनांचा हक्क असतो. सरकार त्या नक्कीच पूर्ण करेल. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या लोकांची मी प्रतिनिधी आहे, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सरकारने त्यांच्या पक्षातील लोकांना किती निधी द्यायचा हा त्यांचा प्रश्न असं त्यांनी स्पष्ट केलं.
चर्चा करण्यात सरकार कमी पडले
यावेळी त्यांनी एसटी संपावरून सरकारवर टीका केली. एसटीबाबत व्यवस्थित चर्चा झाली नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे हा वाद चिघळला आहे, असा दावा त्यांनी केला.
तपास यंत्रणआ तपास करतील
यावेळी त्यांनी शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर पडलेल्या धाडीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. तपास यंत्रणा तपास करतील. मी फार बोलणार नाही. मुख्यमंत्री सभागृहात काय बोलले हे मी ऐकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
आरक्षणाशिवाय निवडणुका नको
ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने काही पावलं उचलली आहेत. पण निवडणुका जेव्हा कधी होतील तेव्हा त्या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत ही माझी आधी पासूनच भूमिका आहे, असंही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या:
महाराष्ट्रात 2024 ला बहुमताचं सरकार येणार, Devendra Fadnavis यांचा गोव्यातून मविआला इशारा
VIDEO: धर्मेंद्र प्रधान यांच्या स्वप्नातली रिफायनरी Nanarमध्ये नक्कीच होणार नाही: विनायक राऊत