दुर्गा अष्टमीपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा; अन्यथा आंदोलन अटळ : पंकजा मुंडे
राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांचे प्रश्न दुर्गाअष्टमीपर्यंत सोडवा अन्यथा आंदोलन अटळ आहे. असा इशारा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला.
नांदेड : “राज्यात ऊसतोड कामगारांचे प्रश्न बिकट आहेत. त्यांचे प्रश्न दुर्गाअष्टमीपर्यंत सोडवा अन्यथा आंदोलन अटळ आहे.” असा इशारा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला. त्या नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करत होत्या. (Solve problems of sugarcane workers till Durga Ashtami Pankaja Munde given ultimatum to state government)
नांदेडमध्ये नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेतातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी केली. त्या म्हणाल्या, “राज्यातल्या ऊसतोड कामगारांचा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता. पण कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण चाललं. दुर्गा अष्टमीपर्यंत त्यांचे प्रश्न मिटले पाहिजेत, अन्यथा सरकारला ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल.”
यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा दाखला देत राज्य सरकारवर टीका केली. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात उसतोड कामगारांचे आणि कारखानदार लवादाचे प्रश्न दोन बैठकीत मिटायचे. त्यांचीच परंपरा आम्हे चालू ठेवल्याचं त्या म्हणाल्या. तसेच दसऱ्यापर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवा, अन्यथा दुर्गा अष्टमीच्या दिवशी ऊसतोड कामगार दुर्गेचा अवतार घेतील, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी साखर कारखानदार, साखर संघ, आणि राज्यातील सरकारला दिला. दरम्यान,पंकजा मुंडे यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केंद्राकडून मदतीसाठी आम्ही प्रयत्न करू
पंकजा मुंडे यांनी शेतमालाच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं असून राज्यातला तो उपाशी राहायला नकोय असे म्हणत, पिकांच्या नुकसानीचे ठोकताळे ठरवून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. तसेच सरकारला कोणताही पक्ष नसतो. सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत असतं. राज्य सरकार जनतेचे पालक आहे. सध्या राज्याने शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्राकडून मदत आणण्यासाठी आम्ही जमेल तशी मदत करु असे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्या नात्यात पक्ष बिक्ष येऊच शकत नाही : पंकजा मुंडे
आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. नांदेड मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारने उशीर करू नये. प्रत्येक पिकाबाबतचे थोकताळे ठरवून शेतकऱ्यांना आताच मदत देणे गरजेचे असल्याचं मतही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं आहे.
संबंधित बातम्या :
एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य
जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची; पंकजा मुंडेंकडून फडणवीसांची पाठराखण
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
(Solve problems of sugarcane workers till Durga Ashtami Pankaja Munde given ultimatum to state government)