अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

अपघातग्रस्त स्विफ्ट कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिले थांबले होते. मात्र त्यांच्याही मर्सिडीज कारला टेम्पोने धडक दिली (Panvel Corporator Mercedes Car Accident )

अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप
पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिले
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 10:10 AM

पनवेल : अपघातग्रस्त कारला मदत करण्यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर थांबलेल्या पनवेल नगरसेवकाच्या मर्सिडीज कारला आयशर  टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर नगरसेवक तेजस कांडपिले सुखरुप आहेत. इतरांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या देवदूतांवरच नियतीने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Panvel Corporator Tejas Kandpile stops Mercedes Car to help Accident victims Car gets hit by tempo)

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अपघात

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ सोमवारी रात्री अनेक गाड्यांचा भीषण अपघात झाला. आधी स्विफ्ट कारला कंटेनर ट्रेलरने धडक दिली. पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती.

नगरसेवकाच्या मर्सिडीजला टेम्पोची धडक

अपघातग्रस्त स्विफ्ट कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिले थांबले होते. मात्र त्यांच्याही मर्सिडीज कारला टेम्पोने धडक दिली. अपघातात पनवेलचे दोघे जण मृत्युमुखी पडले, तर दोघे जण जखमी आहेत. जखमी प्रवाशांना नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीएम रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने नगरसेवक तेजस कांडपिले अपघातातून बालंबाल बचावले.

देवदूतांच्या निधनाने पनवेल हळहळले

अपघातात पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे 26 वर्षीय अध्यक्ष सुशांत मोहिते आणि 24 वर्षीय प्रथमेश बहिरा यांना प्राण गमवावे लागले. ते दोघेही पनवेलचे रहिवासी होते. तर हर्षद खुदकर हे जखमी झाले आहेत. नगरसेवक तेजस कांडपिलेही किरकोळ जखमी झाले आहेत. या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मदत करणाऱ्या दोघा देवदुतांना अपघातात मृत्यू आल्याने पनवेल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Panvel Corporator Tejas Kandpile stops Mercedes Car to help Accident victims Car gets hit by tempo)

पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते

रायगडच्या देवदूताचे चिमुकल्याला जीवदान

वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

संबंधित बातम्या :

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

(Panvel Corporator Sharad Kandpile stops Mercedes Car to help Accident victims Car gets hit by tempo)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.