पनवेल महापालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी खास नियंत्रण कक्ष, एका मेसेजवर मिळणार बेडची माहिती
एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर रुग्ण आणि रुग्णांचा संपर्क करुन देण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. (PMC Special control room for covid 19)
पनवेल : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेसाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष उभारले आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेटिंलेटर बेड उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे. त्याशिवाय एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर रुग्ण आणि रुग्णांचा संपर्क करुन देण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. (Panvel Municipal Corporation Special control room for corona patients get bed information through WhatsApp message)
राज्य सरकारने ठरवून दिलेल्या 80:20 धोरणांनुसार सर्व खाजगी कोव्हिड -19 रुग्णालयांना 80 टक्के बेड महापालिकांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. हे नियंत्रण कक्षातील पथक या रुग्णांलयांवर लक्ष ठेवून असणार आहे. बेड उपलब्धतेसाठी रूग्णालयांनी डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत करण्यावरही हे पथक लक्ष ठेवणार आहे. बेड उपलब्धतेसाठी 8928931034/ 8928931049 या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
बेडची माहिती कशी मिळणार?
- पनवेल महापालिका हद्दीत बेडसाठी 8928931041/ 8928931052 हे दोन व्हॉटस् अॅप नंबर देण्यात आले आहेत.
- या नंबरवर केवळ नागरिकांनी रुग्णांची माहिती (कागदपत्रे) नियंत्रण कक्षातील पथकास द्यावी.
- त्यानंतर बेड उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांशी संबधित नातेवाईक आणि संबधित रूग्णालय यांच्यामध्ये संपर्क साधेल.
नियंत्रण कक्षाचे काम काय?
- प्रत्येक दिवशी सर्व कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना देऊन सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येईल
- तो बेड गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन हे पथक रुग्णांलयाना सूचना देईल
- रोजच्या रोज कोव्हिड रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूबाबत माहिती गोळा करुन ती आरोग्य विभागाकडे दिली जाईल.
- तसेच महानगरपालिकेव्दारे चालविल्या जात असलेल्या किंवा कराराने उपलब्ध करून घेतलेल्या रुग्णालयात रूग्ण दाखल करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाईल.
पथकाचे काम 24 तास चालणार
दरम्याने हे पथक 24 तास काम करणार आहे. तीन वेगवेळी पथके सकाळी 8.00 ते सायं. 4.00 , सायं 400 ते रात्री 12.00, रात्री 12.00 ते सकाळी 8.00 अशा तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहे. या तीन पाळ्यांमध्ये तीन डॉक्टरर्सही या पथकामध्ये असणार आहेत. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेव्दारे करण्यात आले आहे. (Panvel Municipal Corporation Special control room for corona patients get bed information through WhatsApp message)
संबंधित बातम्या :
Coronavirus: कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार
माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका