Parab on Somaiya | सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये, मंत्री परबांचे शेलके उत्तर

दरेकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मला कळाले. तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हती. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत.

Parab on Somaiya | सोमय्या जाता-जाता स्वतः पडले; त्यांनी नौटंकी करू नये, मंत्री परबांचे शेलके उत्तर
किरीट सोमय्या, अनिल परब
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 12:35 PM

नाशिकः परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज नाशिकमध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपवर जोरदार शरसंधान साधले. शिवाय भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केलेल्या आरोपालाही प्रत्युत्तर दिले. सोमय्यांवर हल्ला होणार असल्याचे परबांना माहिती होते. दरेकरांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना परब म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मला कळाले. तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हती. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत. राजकीय नौटंकी करू नये. त्यांना फिजिकल मारहाण झाली नाही. ते जात असताना स्वतः पडले, अशा शब्दांत अनिल परबांनी सोमय्यांवरील आरोपांना उत्तर दिले. आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमके काय म्हणाले होते दरेकर?

मंत्री अनिल परब यांनी दरेकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आज दरेकरही नाशिकमध्ये होते. त्यांनी आघाडी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्यांवरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. नितेश राणे हा सर्वात मोठा प्रश्न मानून आघाडी सरकारचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडलाय. नितेश राणे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे, या अविर्भावात सरकार काम करत आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालीय. मात्र, परिवहन मंत्री एसटी प्रश्न सोडवू शकले नाहीत. सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होतं. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद असल्याचे ते म्हणाले. या आरोपाचा समाचारच परबांनी घेतला.

लतादीदींनी श्रद्धांजली…

अनिल परब यांनी यावेळी लतादीदींनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, आपल्या देशाचे भाग्य थोर आहे की, देशात असा स्वर जन्माला आला. आज तो स्वर हरपला आहे. दैवी चमत्कार असणारा लतांचा आवाज आहे. हा आवाज शतकानुशतके राहील. त्यांच्या निधनाने पूर्ण देश शोकाकुल झाला आहे. माझी देखील त्यांना श्रद्धांजली आहे. महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा लतादीदी त्या कार्यक्रमातला होत्या. त्यावेळी लता दीदींना भेटण्याचा योग आला होता, अशी आठवणही परब यांनी यावेळी सांगितली.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

लता मंगेशकरांचे गाणे आपल्याला कितीही आवडे, पण आपण ‘क्या कमाल कि गाती है’ असं नाही म्हणू शकत, का ते जाणून घ्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.