धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो, नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत
नंजय मुंडे यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दूर होण्यासाठी नगरसेवकाने प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी दंडवत घातलं आहे.
बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Parali Corporator Gopal Andhale Prays for Dhananjay Munde) यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दूर होण्यासाठी नगरसेवकाने प्रभू वैद्यनाथ यांच्या चरणी दंडवत घातलं आहे. परळी नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी सपत्नीक प्रभू वैद्यनाथ चरणी दंडवत घातलं (Parali Corporator Gopal Andhale Prays for Dhananjay Munde).
धनंजय मुंडे सध्या मोठ्या संकटात आहेत. त्यांच्यावरील संकट दूर व्हावे, म्हणून परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली. ढोल ताशांच्या गजरात हे दंडवत घालण्यात आले.
धनंजय मुंडेंवर शुक्लकाष्ठ
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर त्यांच्यात नात्यातील रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी देखील हे प्रकरण उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तब्बल पाच दिवस हे प्रकरण राज्यभरात गाजले. मुंडे सध्या मुंबईतच आहेत. त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असा दावा मुंडे समर्थकांनी केला आहे.
तर कालच भाजप महिला आघाडीने मुंडेंविरोधात रस्त्यावर उतरुन राज्यभर आंदोलन केले होते. मंत्री धनंजय मुंडे सध्या मोठ्या संकटात आहेत, त्यामुळे त्यांचे संकट दूर होवो यासाठी परळी येथील नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभू वैद्यनाथांच्या चरणी अक्षरश दंडवत घातले. शहरातून ढोल ताशांच्या गजरात दंडवत घालत ते थेट वैद्यनाथांच्या चरणी पोहचले.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले (Parali Corporator Gopal Andhale Prays for Dhananjay Munde).
त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.”
Special Story | Honey Trap | जपून चाल… पुढे धोका आहे…. हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?#DhananjayMunde #RenuSharma #HoneyTraphttps://t.co/5QKdz6BtvT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 17, 2021
Parali Corporator Gopal Andhale Prays for Dhananjay Munde
संबंधित बातम्या :
मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?
“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट
धनंजय मुंडेंचा रेणू शर्मावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव; वकिलाचा दावा
Dhananjay Munde Case | पोलिसांवर विश्वास, मुंडे प्रकरणाची ते योग्य चौकशी करतील : सुप्रिया सुळे