एक वेळा नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार…; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

CM Eknath Shinde on Vidhansabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीत सभा होत आहे. या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी परभणीकरांना महत्वाचं आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे परभणीच्या सभेत काय म्हणाले? वाचा सविस्तर....

एक वेळा नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार...; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 1:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणीत आहेत. तिथे त्यांची सभा पार पडली. परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना- महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे आणि जिंतूर मतदारसंघातून भाजप- महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी शिंदे परभणीत आहेत. लाडकी बहीण योजनेवर शिंदे बोलले आहेत. लाडक्या बहिणीसाठी जेलमध्ये जायचं असेल तर एक वेळा नाही तर शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. मी संघर्षातूनवर आलोय. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहे. कोणी माझ्या केसाला धक्का लावू शकत नाही. पाच हप्ते बहिणीच्या खात्यात दिले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मविआवर निशाणा

शेतकऱ्यांचा विज बिल माफ करण्याचे काम आम्ही केला आहे. लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली आहे. विरोधकांच्या पोटात दुखलं. महायुती सरकार म्हणजे ही देना बँक आहे लेना बँक नाही… बहिणींसाठी आम्ही आखडता हात घेणार नाही. यांना दीड हजारची किंमत कळणार नाही. मात्र माझ्या लाडक्या बहिणींना त्याची किंमत माहिती आहे. लाडक्या बहिणीसाठी आपण योजना राबवली आहे. लाडक्या बहिणीची योजना मी बंद होऊ देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

विरोधक म्हणतात लाडके बहीण योजनेची चौकशी लावू, आम्हाला जेलमध्ये टाकू… अरे कोणाला धमकी देता, तुम्ही सरकारमध्ये येणारच नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा. सगळे लोक आनंद भरोसे यांच्या कामाला लागले तर विरोधकांचा डिपॉझिट वाचणार नाही, असंही ते म्हणाले.

परभणीतील सभेत त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. आनंद भरोसेवर भरोसा करा. आनंद भरोसेवर भरोसा म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंवर भरोसा… मेघना बोर्डीकर या उमेदवार आहेत. मेघना बोर्डीकर यांना विजयी करा. 23 तारखेला दिवाळीचे फटाकडे फोडायला मी तुमच्यासोबत येणार आहे. तुम्ही वेळ काढून आनंद भरोसे यांना मतदान करा. मेघना बोर्डीकर यांना मतदान करा. हे दोघे पाच वर्ष तुमची सेवा करतील. आम्ही मालक नाही सेवक आहोत, असा शब्द शिंदेंनी परभणीकरांना दिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.