जाळपोळ, दगडफेक, लाठीमार, परभणीत बंदला हिंसक वळण; आतापर्यंतची A टू Z अपडेट काय?

काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे.

जाळपोळ, दगडफेक, लाठीमार, परभणीत बंदला हिंसक वळण; आतापर्यंतची A टू Z अपडेट काय?
परभणी
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 2:02 PM

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची एका माथेफिरुने विटंबना केली. या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. काही आंदोलकांकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सध्या परभणीत तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळत आहे.

परभणीत नेमकं काय घडलं?

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली आहे. काल मंगळवारी (१० डिसेंबर) एका माथेफिरूने संध्याकाळी 5.30 च्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला उपस्थितांकडून जोरदार चोप देण्यात आला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेच्या प्रतीची विटंबना झाल्यानतंर आंबेडकर अनुयायी संतप्त झाले. या घटनेनंतर काल आंबेडकरी अनुयायींकडून आंबेडकर पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांकडून काल रेल रोकोही करण्यात आला. यानतंर रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरु होते.

परभणी बंदची हाक, आंदोलनाला हिंसक वळण

आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला होता. आता हे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी दुकाने, रस्त्यावर गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली.

यानंतर काही आंदोलक महिलांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यानंतर पोलिसांनीही अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच सध्या परभणीत दंगल नियंत्रण पथकही दाखल झाले आहे.

राहुल पाटील काय म्हणाले?

मी आंदोलकांना सातत्याने शांत राहा असे आवाहन करत आहे. मी सध्या शिवाजी चौकात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही घाबरुन जाऊ नका. काल झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपण शांततेने हे आंदोलन करावे, असे आवाहन ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील केले.

काल झालेली घटना दुर्दैवी

“आंबडेकरी अनुयायींना आवाहन करतो की काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. पण आता जी काही परिस्थिती आहे, ती शांततने हाताळावी. या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना जो काही त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी दिली.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.