Pune | बिबवेवाडीतील शाळेत पालकाला बाऊन्सरकडून मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल

Pune | बिबवेवाडीतील शाळेत पालकाला बाऊन्सरकडून मारहाण, पोलिसांत तक्रार दाखल

| Updated on: Mar 12, 2022 | 4:36 PM

पुण्यातील (Pune) बिबवेवाडीतील (Bibwewadi) क्लाइन मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण (Beaten) करण्यात आलीय. शाळेतील विविध मागण्यासाठी निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना खासगी बॉन्सरने शिवीगाळ करत  मारहाण केली.

पुण्यातील (Pune) बिबवेवाडीतील (Bibwewadi) क्लाइन मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण (Beaten) करण्यात आलीय. शाळेतील विविध मागण्यासाठी निवेदन घेऊन गेलेल्या पालकांना खासगी बॉन्सरने शिवीगाळ करत  मारहाण केली. यावेळी शाळेत पालक आणि काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. दरम्यान, शाळेच्या मॅनेजमेंट आणि बाऊन्सरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या परिसरातील आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालक आता संतप्त झाले आहेत. सर्व पालकांनी शाळेत धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. वाढलेल्या फीवरून हा सर्व राडा झाल्याचे बोलते जात आहे. अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पालक मात्र याप्रकरणी आक्रमक झाले आहेत.
Published on: Mar 12, 2022 04:33 PM