Parli : परळीचं बसस्थानक मोजतय शेवटच्या घटका, जागोजागी खड्डे अन् मोकाट प्राण्यांचा ताप
रविवारी परळीमध्ये (Parli) जोरदार पाऊस (rain) पडला. या पावसामुळे परळीच्या बस स्थानकाला (bus station) बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.
परळी : रविवारी परळीमध्ये (Parli) जोरदार पाऊस (rain) पडला. या पावसामुळे परळीच्या बस स्थानकाला (bus station) बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. मोकाट जणावरांचा ताप देखील वाढला आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. या बस स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथ मंदिर देखील इथेच असल्याने नेहमीच परळीत भाविक आणि पर्यटकांची वर्दळ असते. राज्यासह परराज्यातील प्रवासी इथेच उतरतात. असं असताना इथे सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. मात्र या बस स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. बसस्थानकात असलेल्या असुविधांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसस्थानकांची दुरुस्ती कधी करण्यात येणार याकडे आता प्रवाशांचं लक्ष लागलं आहे.
धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ
दरम्यान दुसरीकडे परळी हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ मानला जातो. राज्याच्या राजकारणात दोन्ही भावा बहिणेचे मोठे वजन आहे. मात्र असे असून देखील परळी शहरातील बसस्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यापूर्वी दोनवेळा बांधकामाचे उद्घाटन झाले मात्र ते कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा हा मतदाससंघ असल्याने किमान शहरात तरी सर्व सोईसुविधा असाव्यात अशी अपेक्षा जनसामान्याची असते. मात्र इथे चित्र उलटे आहे. बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, असुविधेमुळे इथे उतरणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसस्थानकात जागोजागी खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचले आहे.
बसस्थानक परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य
बसस्थानक परिसरात खड्डेच-खड्डे पडल्याचे पहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे बसस्थानकात बस पार्क करताना चालकांना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने परळी बसस्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना त्रास होतो. तसेच परिसरात मोकाट प्राण्यांचा मुक्त वावर असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या बसस्थानकाची दुरुस्ती कधी होणार याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.