Railway | क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, परळी जवळच्या स्टेशनवर काय घडली घटना?

वडगाव येथे फक्त दहाच मिनिटे रेल्वे थांबली होती. मात्र तेवढ्यात चोरट्यांनी पाच महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. या संपूर्ण चोरीत एकूण दहा तोळ्यांचे दागिने चोरल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. परळी रेल्वे स्टेशनमध्ये सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Railway | क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले, परळी जवळच्या स्टेशनवर काय घडली घटना?
परळीजवळील वडगाव स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेत चोरी
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:27 PM

परळी : रात्रीच्या वेळी रेल्वेतून प्रवास करणे सुरक्षित व्हावे, याकरिता रेल्वे पोलिसांकडून (Railway Police) पुरेशी खबरदारी घेतली जाते. मात्र अनेकदा प्रवासी आणि चोरांना ओळखण्यात पोलीस अपयशी ठरतात, अशी उदाहरणं दिसून येतात. परळी ते परभणी रेल्वे मार्गावरही असाच प्रकार (Theft in Railway) घडला. या मार्गावरील एका स्टेशनवर क्रॉसिंगसाठी रेल्वे थांबलेली होती. पहाटेच्या वेळी गाडी स्टेशनला (Railway Station) थांबलेली होती. त्यावेळेचा फायदा घेत खिडकीतून हात घालीत चोरट्यांनी तब्बल पाच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेत्याची धक्कादायक घटना घडली. चोरीच्या या घटनेमुळे रेल्वेत एकच खळबळ माजली. मात्र झोपेत असलेल्या प्रवाशांना चोरट्यांची चाहूल लागेपर्यंत खूप उशीर झाला होता. दहा मिनिटात रेल्वे सुरुदेखील झाली. त्यामुळे खिडकीतून कुणी चोरून नेले, हेही पाहणे कठीण झाले. अखेर पुढील स्टेशनवर पोहोचल्यावर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.

काय घडली घटना?

परभणी ते परळी या मार्गादरम्यान शिर्डी सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये सदर घटना घडली. मंगळवारी पहाटे चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला. या मार्गावरील वडगाव या स्टेशनवर रेल्वे क्रॉसिंगसाठी गाडी थांबली होती. त्यावेळी खिडकीतून हात घालीत पाच प्रवासी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले. यामुळे रेल्वेच बराच गोंधळ माजला.

दहा मिनिटात दहा तोळे सोने चोरले

वडगाव येथे फक्त दहाच मिनिटे रेल्वे थांबली होती. मात्र तेवढ्यात चोरट्यांनी पाच महिलांचे मंगळसूत्र हिसकावले. या संपूर्ण चोरीत एकूण दहा तोळ्यांचे दागिने चोरल्याची माहिती तक्रारदारांनी दिली आहे. परळी रेल्वे स्टेशनमध्ये सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

इतर बातम्या-

Raj Thackeray | राज्याचं लक्ष औरंगाबादच्या सभेकडे, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी, पोलिसांची परवानगी मिळणार का?

पुण्यात आंदोलकांवर लाठीचार्ज !

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.